महापालिकेमार्फत जेष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन सेवा
मीरारोड पूर्व :
मिरा भाईंदर महापालिकेमार्फत करोना विषाणूंवर प्रतिबंध घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे.शहरातील जेष्ठ नागरिक आणि दिव्यागांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेने हेल्पनाईन सेवा सुरू केली आहे . 022-28117104 या क्रमांकावर संपर्क केल्यास मदत मिळणार आहे .जेष्ठ नागरिकांना मनपा कर्मचाऱ्यांमार्फत घरपोच जेवण पुरवले जाणार आहे.तसेच औषधे व किराणा सामान हवे असल्यास जवळच्या दुकांनदाराशी संपर्क साधून दिला जाणार आहे .मिरा भाईंदर महानगर पालिकेकडून हेल्पलाईनच्या माध्यमातून
आता पर्यंत 40 जेष्ठ नागरिकांना अन्न पुरवण्यात आले असून 100 दिव्यागांच्या जेवण्याची सोय करण्यात आली आहे.हेल्पलाईनच्या क्रमांकावर मदत मागितल्यास संबंधितांना मदत केली जाणार आहे .लॉकडाऊन मध्ये उद्योग धंदे बंद असल्यामुळे अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे .दिव्यागं आणि जेष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केला आहे . हेल्पलाईन सुरू केल्यामुळे अनेक जेष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.