महानगर पालिकेच कम्युनिटी किचन, बनवणार ३५ हजार लोकांचं जेवण

महानगर पालिकेच कम्युनिटी किचन बनवणार ३५ हजार लोकांचं जेवणमहानगर पालिकेच कम्युनिटी किचन बनवणार ३५ हजार लोकांचं जेवण


मीरा-भाईंदर शहरातील तीन ठिकाणी कम्युनिटी किचन बनावण्यात येत आहेत त्यामधून शहरातील बेघर, परराज्यातील विस्थापित कामगार व बंद असलेल्या उधोगातील प्रभावित कामगार यांच्या जेवणाची सोय केली जाणार आहे या नेक कामासाठी शहरातील अनेक संस्था पुढे आल्या आहेत. 


देशावर आलेले कोरोनाच्या महामारीचे संकट, या संकटाला रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना म्हणून देशात घोषित करण्यात आलेली संचारबंदी व लॉकडाउनमुळे या कामगार,बेघर व्यक्तींचे हाल होऊ नये म्हणून मनपाने शहरातील सामाजिक संघटना, संस्था, मंडळे, दानसुर व्यक्तींना या उद्भवलेल्या परस्थितीवर मात करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील अनेक संस्था पुढे आल्या आहेत. शहरातील बेघर,विस्थापित कामगार, प्रभावित कामगार,यांच्यासाठी मदतीचा हात मनपाला दिला आहे. मनपाने या बेघर,कामगारांना अन्न, पाणी,निवासगृह,वैद्यकीय सेवा, त्याच बरोबर अनेक संस्थाच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या करिता शहरात तीन ठिकाणी कम्युनिटी किचन भाईंदर पश्चिम सुभाषचंद्र बोस मैदान,वर्धमान फेन्टशी मिरारोड, व डेल्टा गार्डन येथील शेलटर होम येथे कम्युनिटी किचन बनावण्यात येत आहेत. या कम्युनिटी किचन मधून शहरातील  ३५००० लोकांसाठी जेवण बनावण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
या किचन आणि भोजन चे व्यवस्थापन करण्यासाठी मनपा स्थरावर एक समिती स्थापन केली आहे.त्यात अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त,शहर अभियंता, मुख्यलेखाधिकारी तर समितीचे सचिव म्हणून नगरचनाकार यांचा समावेश केला आहे.
नोडल अधिकारी म्हणून दिलीप घेवारे आहेत तर त्यांच्या मदतीला कनिष्ठ अभियंता यशवंतदेशमुख, विकास परब,श्रीकृष्ण मोहिते हे असणार आहेत.
प्रत्येक विभागासाठी एक नोडल अधिकारी कनिष्ठ अभियंता दर्जाचा असेल आणि त्यांच्यावर प्रभाग अधिकारी नियंत्रण ठेवणार आहेत. असे व्यवस्थापन केले आहे तर या व्यवस्थापनाणे केलेल्या कामाचा दररोज आढावा  जिल्हाअधिकारी यांच्याकडे पाठविला जाईल याची जबाबदारी नागेश विरकर व दिनेश कानुगडे यांना देण्यात आली आहे आणि या संपूर्ण उपक्रमावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिग्विजय चव्हाण मुख्यलेखापरिक्षक यांच्यावर सोपवली आहे.