मीरा भाईंदरात कोरोना रुग्ण ४७ तर आज ११ जण आढळले बाधित

मिरा-भाईंदर शहरात कोरोना बाधित होण्याचा आकडा चक्क आज  ११ वर पोहचला आहे. मिरा-भाईंदरमध्ये होत असलेली कोरोना रुग्णांची वाढ ही शहराची चिंताजनक परिस्थिती निर्माण करणारी आहे शहरात आता एकूण कोरोनाची रुग्णसंख्या ४७ झाली असून त्यात दोन जणांचा मृत्यू- झाला आहे.तर दोघेजण बरे होऊन कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरातील मिरारोडमध्ये सर्वाधिक ३२ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून त्यात नया नगर – १४ ,मेडतीया नगर – २,नित्यानंद नगर – २,आरएनए ब्रॉडवे – ३,बेवर्ली पार्क -२,विनय नगर – २,पूजा नगर – ४ पूनम क्लस्टर १,सिल्व्हर पार्क १,पूनम सागर १ हे विभाग आहेत.भाईंदर पूर्व याठिकाणी एकूण ९ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यात एस.वी.रोड नवघर -१ ,गोडदेव -७ ,एमआई मस्जिद याठिकाणी- १ तर भाईंदर पश्विमेकडे एकूण ६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यात नारायण नगर – ५ ,शिवसेना गल्ली – १ या भागाचा समावेश आहे.दरम्यान शहरातील संशयित रुग्णांची खाजगी लॅब द्वारे तपासणी आता पालिकेमार्फत केली जाणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. तर आज बाधित आढळून ९ रुग्ण हे घरातील पहिल्या रुग्णांच्या संपर्कातून आलेले आहेत तर दोन रुग्ण मात्र नवीन आढळून आले आहेत.