नगरसेविकेने दिला कोरोनाग्रस्तांसाठी 25 लाखांचा निधी

नगरसेविकेने दिला कोरोनाग्रस्तांसाठी 25 लाखांचा निधी


मीरारोड पूर्व : 


                महाराष्ट्रात दिवसेदिवस कोरोना विषाणूंची लागणं झालेल्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकार विविध आवाहने व  उपाययोजना करत आहे. त्या अनुषंगाने आता मीरा भाईंदर मधील ९५ नगरसेवकांपैकी प्रभाग क्रमांक १२ मधील भाजप नगरसेविका डॉ. प्रीती पाटील यांनी आपला सर्व १५ लाखांचा नगरसेवक व १० लाखांचा असा एकूण २५ लाखांचा निधी मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकड़े कोरोनाग्रस्तांसाठी दिल्याचे जाहीर केले आहे.
         जगात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत या रोगावर औषध निघाले नाही. यामुळे अनेक रुग्णामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशासमोर मोठी आपत्ती निर्माण झाली आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी देशभरारातून मोठया मदतीचा ओघ सुरू आहे.  या कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या नगरसेविका प्रीती पाटील यांनी त्यांचा १५ लाख नगरसेवक  व  १० लाख प्रभाग निधी असा एकूण २५ लाखांचा निधी कोरोनाग्रस्तांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. मीरा भाईंदर पालिकेत सर्वात अगोदर मदत करणाऱ्या त्या नगरसेविका ठरल्या आहेत.याबाबत त्यांनी प्रत्यक्ष आयुक्तांची भेट घेऊन त्यांना आपला निधी कोरोनाच्या रुग्णाच्या मदती करता द्यायचा असल्याची ईच्छा व्यक्त केली व आयुक्तानी त्याना होकार देत या बाबत अधिकृत मेल पालिकेला करा अशे सांगितले आहे.  प्रिती पाटील या स्वता एक डॉक्टर असल्यामुळे त्याना सध्याच्या परिस्तिथिची जाणीव आहे. आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत.ही जानिव त्याना आहे. त्यामुळे विकास कामा करता वापरण्यात येणारा निधीची खरी गरज कोरोनाच्या साथिने पछाडलेल्या रुग्णाना नीट करण्या करता आहे. त्याच बरोबर आपल्या निधिने महा नगर पालिका क्षेत्रातील डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षते साठी एन९५ मास्क,पिपिई किट याच बरोबर मीरा भाईंदर मधील जनतेच्या सुरक्षते साठी फॉगिंग मशीन व हायड्रो क्लोराइड मशीन खरेदी करण्या करता माझ्या नगरसेवक निधिचा वापर करन्यात यावा अशी विनंती डॉ. प्रिती पाटील यांनी आयुक्ताना केली आहे.


प्रतिक्रिया : 


सध्या शहरातील वाढती कोरोना रुग्णाची संख्या बघता या परिस्तिथित लोकांचे आरोग्य महत्वाचे आहे त्यामुळे मीरा भाईंदर शहरातील लोकांच्या चांगल्या आरोग्या करता मी माझा नगरसेवक  निधि देत आहे. शहरात संचारबंदी,लॉक डाऊन करण्यात आले आहे त्यामुळे विणाकारण घरा बाहेर पडू नका व सोशल डिस्टिंगज पाळा.


प्रिती पाटील( नगरसेविका ,प्रभाग क्रमांक १२ )