खोट्या मॅसेज ची नगरसेवकाने घेतली तात्काळ दखल (पोलिस मदत पत्र ) मीरारोड

 


खोट्या मॅसेज ची नगरसेवकाने घेतली तात्काळ दखल


(पोलिस मदत पत्र ) मीरारोड :


समाज माध्यमातून फिरणाऱ्या एका मेसेज मुळे नवघर रोड परिसरातील नागरिकांत काल रात्री पासून भीतीयुक्त वतावरण निर्माण झाले होते. त्या संदेशात असे नमूद केले होते की,(मॅसेज) मध्यें वरील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की या नवघर परिसरात covid-19 या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सदर परिसरातील भागात संशयित क्षेत्र म्हणून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशी खोटी बातमी व्हाट्सएपच्या माध्यमातून पसरत होती याची या परिसरातील नगरसेवक दिनेश नलावडे यांनी  स्वतः दखल घेत आयुक्त महोदयांसी चर्चा करून या व्हायरल होत असलेल्या संदेशाचे खंडन करत दुसरा संदेश समाज माध्यमातून नागरिकांना पाठवला की असे काही घडले नाही कोणीही घाबरून जाऊ नये व चुकीचा संदेश पसरवू नये .


आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या नावाने समाजमाध्यमातून व्हाट्सअपद्वारे मीरा-भाईंदर शहरात एक संदेश फॉरवर्ड केला जात होता. सध्या कोरोना साथीने  निर्माण केलेली परस्थितीत त्यात खोटे संदेश या मुळे नागरिकांत भीती पसरू शकते.या मॅसेज मध्ये असे नमूद केले होते की "नवघर रोड" हा भाग संशयित क्षेत्र म्हणून घोषित करत आहे. त्यामुळे सदर भागात "रेड अलर्ट" घोषित करण्यात येत आहे अशी बातमी व्हाट्सअप च्या माध्यमातून शहरात हिरात होती.
   या विषयाचे गांभीर्य ओळखून नागरिकांत भीतीचे संदेश जाऊ नयेत म्हणून रात्रीच या परिसराचे नगरसेवक   दिनेश नलावडे यांनी  स्वतः मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला आणि व्हायरल होत असलेल्या संदेशासंदर्भात शहानिशा केली तर असे काळले की, नवघर रोड बाबत जी काय बातमी फिरत आहे ती खोटी आहे त्या जाहीर सुचणे बद्दल आयुक्त साहेबांनी खंडन केले आहे त्याचे सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.असेही त्यानीं सोशल मीडियावर टाकलेल्या संदेशात म्हटले आहे.
      तरी स्नेहा लेन परिसरात एका नागरिकास टेंभा हॉस्पिटलमध्ये खोकला, ताप, लूज मोशन या कारणामुळे ऍडमिट करण्यात आले होते तरी त्यांचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तरी सध्या त्यांना डॉक्टरांनी १४ दिवस होम क्वारंटाईन मध्ये घरी ठेवलेले आहे.
    तरी नवघर रोड वरील नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही तरी आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे घरी बसा आणि कोरोनाला शहरातून घालावा असे दिनेश नलावडे यांनी  शहरातील आणि नवघर परिसरातील नागरिकांनाआवाहन केले आहे. 


नगरसेवक दिनेश नलावडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन केला पण त्यांच्याकडून प्रतिउत्तर मिळाले नसल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया देता आली नाही.


प्रतिक्रिया


प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक अनंत शिर्के यांच्याशी फोनद्वारे व्हायरल होणाऱ्या संदेशा बाबत जाणून घेण्यासाठी फोन केला असता त्यानीं ही खोटी अफवा आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी खोटे आणि चुकीचे मॅसेज व्हायरल करू नये पहिले पडताळणी करूनच मॅसेज फॉरवर्ड करावे कारण सध्या कोरोनाने थैमान घातल्यामुळें नागरिकांच्या मनात पहिलीच भीती तयार झालेली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये घरीच रहावे बाहेर फिरणे टाळावे असे आवाहन केले आहे.


【नगरसेवक अनंत शिर्के


प्रभाग क्रमांक ११】