विनय दुबे याची गाडी केली पोलिसानी केली जमा
वांद्रे पश्चिम परिसरात रेल्वे स्थानका बाहेर मजूरांचा जमाव जमावल्या प्रकरणातील मुख्य आरोप लावण्यात आलेल्या पैकी असलेला आरोपी विनय दुबे याची गाडी तपासणी जप्त केली आहे. ही गाडी पंचनाम्यासाठी ताब्यात घेतली असून त्याचा वापर पुरावा म्हणून केला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विनय दुबे याला न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उत्तर भारतीयांचा नेता म्हणून छबी तयार करण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. उत्तर भारतीय महापंचायतचा प्रमुख असून विनय दुबे याने मजुरांना व्हिडीओमार्फत भडकविल्याचा आरोप लावला गेला आहे. त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याने हा व्हिडीओ त्याच्या सफारी गाडीमध्ये बसून बनविला. त्यानुसार त्याची ती गाडी हस्तगत करण्यात आल्याचे त्याच्या घरच्यांना पोलिसांकडून सांगण्यात आले. या गाडीचा पंचनामा करण्यात येणार असून, गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास ही गाडी रबाळे परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतली.
पोलिस पुरावा म्हणून गुन्ह्यात त्याने वापरलेली प्रत्येक वस्तू पोलीस ताब्यात घेत आहेत. तपासात कोणतीही कमी राहू नये या साठी पोलिस मेहनत घेत आहेत. अॅड. तन्वीर फारुखी यांनी सांगितले की, दुबे यांच्या कुटुंबीयांना सोशल मीडियावरून येणाऱ्या धमक्यांचे प्रमाण वाढले आहे त्यांना धोकाआहे म्हणून कुटुंबाला सुरक्षा पुरविणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणातील १२ संशयित आरोपी पैकी पत्रकार राहुल कुलकर्णीला जामीन देण्यात आला आहे, तर दुबे व्यतिरिक्त अन्य दहा जणांची पोलीस कोठडी १९ एप्रिल रोजी संपत आहे.