लॉकडाउनचा काळ तिच्या साठी क्रूर बनला, नराधमांनी केला तिच्या अब्रू वर हमला
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. देशातली सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज्यात अडकलेल्या लोकांची व्यवस्था सरकारने केली आहे. लॉकडाउन काळात शाळेत आसरा मिळालेल्या ४० वर्षीय महिलेवर राजस्थानमध्ये बलात्कार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
देशात सुरू असलेला लॉकडाउन तिच्यासाठी क्रूर काळ बनला आहे. महिन्याभरापासून अडकून पडलेल्या महिलेच्या इज्जतीवरच तीन नराधमांनी हल्ला केला आहे. माजबुरीत सापडलेल्या महिलेच्या अब्रूचे लचके तिथे असलेल्या हैवनांनी तोडले आहेत. जयपूर शहरात अडकून पडलेल्या या महिलेला रस्त्यावर फिरत असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी तिची चौकशी करत तिची जवळील शाळेत राहण्याची सोय केली पण तिच्यासाठी काळ मात्र वाईट वेळ घेऊन आला होता.
सवाई माधवपूर जिल्ह्यातील शाळेत २३ ते २४ एप्रिल या कालावधीत पीडित महिलेवर तिघांनी बलात्कार केला.याप्रकरणी पोलिसांनी कमल खरवाल, लखन रायगर आणि ऋषिकेश मीना या तीन जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. याचसोबत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबलचंही निलंबन करण्यात आलेलं आहे. पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली असून अहवाल येणं बाकी असल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
स्थानिक पोलीस माहिती नुसार ही पीडित महिला आपल्या मुलाला भेटण्यासाठी दौसा कारागृहात गेली होती. मुलगा कारागृहात सजा काटत आहे महिलेच्या मुलावर अल्पवयीन मुलीवर बलात्काचारा आरोप आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पीडित महिलेवरही अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल होता, मात्र मार्च २०१९ मध्ये तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. दरम्यान मुलाला भेटून झाल्यानंतर ही महिला लॉकडाउनच्या मुळे ही महिला सवाई माधवपूरमध्ये अडकून पडली होती. अडकल्यामुळे तिच्या राहण्याची सोय जवळील शाळेत करण्यात आली. याच ठिकाणी तिच्यावर बलात्कार झाला असल्याची तक्रार नोंदवली गेली. दरम्यान वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर महिलेची रवानगी स्थानिक क्वारंटाइन सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे.पोलीस पुढील तपास करत आहेत.