रिझर्व्ह बँकेने इतर बँकाना दिले होते आदेश. खाजगी बँकांनी कर्जदारांकडून सुरू केली कर्जाची वसुलीरिझर्व्ह बँकेने इतर बँकाना दिले होते आदेश. खाजगी बँकांनी कर्जदारांकडून सुरू केली कर्जाची वसुली
मीरारोड पूर्व : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी करण्यात आल्याने अनेकांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळेच सरकारने कोरोनाच्या संकटातुन लोकांना सावरण्यासाठी मोठा दिलासा देत ३ महीने कोणत्याही बँकांनी कर्जदारांकडून कर्जाचा हफ्ता न घेता तीन महिन्यानंतर हफ्ता घेण्याची विनंती केली असताना देखील काही बँकांनी आपल्या खातेधारकाच्या खात्यातून चालू महिन्याच्या कर्जाचा हफ्ता परस्पर घेतल्याचे मीरा भाईंदर मधील भावेश गांधी या कर्जरदाराने सांगितले. कोरोनामुळे आर्थिक फटका बसत असतानाच बँक हफ्ता कापत असल्याने कर्जदारांमध्ये रोष व्यक्त करू लागले आहेत.
रिझर्व्ह बँकेकडून कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या कर्जदारांना दिलासा म्हणून तीन महीने त्यांच्याकडुन कोणत्याही प्रकारचा हफ्ता न घेण्याच्या सरकारी निर्देशाला मान्यता देण्यात आली होती. या बाबतचे आदेश देखील रिझर्व्ह बँकेने इतर बँकाना दिले होते. मात्र काही खाजगी बँकांनी कर्जदारांना दिलासा दिला नसल्याचे उघड झाले आहे.दररोज बँकामधून मासिक हफ्ता भरण्याची तारीख जवळ आल्याची आठवण करुण देणारे संदेश,फोन यामुळे कर्जदार चिंतेत पडले आहेत. हफ़्त्याच्या तारखा सुरु झाल्याने कर्जदार संभ्रमात पडले आहेत.
आर्थिक परिस्तिथिचा सामना करत असलेल्या बचत खात्यातील आपल्या जमा रकम्मेमध्ये लोक आपले सध्याचे दिवस काढत आहेत. त्यातच बँकांमधून हफ्ते कपात करणे सुरु झाल्याने कर्जदार संताप व्यक्त करू लागले आहेत. सरकारच्या निवेदनानंतर अनेक बँकानी तीन महीने हफ्ते कापण्यास मनाई केली असली तरी काही खाजगी बँकांनी २ एप्रिल पासुनच कर्जदारांच्या बचत खात्यातून पैसे कापून घेण्यास सुरुवात केली आहे. कर्जाचा हफ्ता ३ महीने न कापण्यासाठी एक ऑनलाइन फॉर्म भरण्याची सोय देखील बँकांनी उपलब्ध केली आहे.जो कर्जदार हा फॉर्म भरेल त्याच्या खात्यातून पैसे कापले जाणार नाहीत.मात्र पैसे कापले जात असल्याने घर कसे चालवायची चिंता कर्जदारांना भेडसावू लागली आहे
प्रतिक्रिया :
मी दुचाकी विकत घेण्यासाठी आयडीएफ़सी बँकेतुन कर्ज काढले होते. सरकारने बँकेला आदेश देऊन देखील २ एप्रिलला माझ्या बचत खात्यातून कर्जाचा हफ्ता कापण्यात आला आहे.
भावेश गांधी ( कर्जदार )