बाबास्या $$$.......
बाबास्या $$$........
तु जलमला नव्हतास तेव्हापासून ......
आम्हीच पुजत व्हतो खंडोबा , जोतिबा , म्हसोबा , इठोबाला !
अन सोबतच मरीमाय , आसराई , जोखाई , मेस्कामायला ! पण ......
तुझा जन्म झाला ..........
तसा आमच्या जीवनातला हजारो वर्षाचा......
अज्ञान अन अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा ........
अंधकार नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली .........!
तु जसजसा एक एक बुकं शिकत गेलास ......
तसंतशी तुझ्या ज्ञानाची भूक वाढतच गेली ..........!
य़ा ज्ञानाच्या भुकेपुढे तु पोटाची भूक मारून टाकलीस....!
पावाच्या एका तुकड्यावर 18 / 18 तास विद्यार्जन केलेस .....!
एम ए , पीएच डी , डी एस्सी , एल एल डी , डी लिट , बार अट लॉ .....!
जिथे अ का ढ वाचता येत नव्हता तिथे जागतिक पदव्याची आरास रचलीस .....!
गेल्या हजारो वर्षात आणि येणाऱ्या कल्पकल्पान्त वर्षात तुझा बुद्धांक काऊंट केला जाऊ शकत नाही कुठल्याच मापात ....!
महामाप सुद्धा अंडरवेट होईल तुझ्यापुढे ....!
तुझा प्रत्येक श्वास अनमोल अन बहुमोल ......!
65 वर्षातल्या काटकसरीने जगलेल्या आयुष्यातील ..
780महिने .......23400 दिवस ......561600 तास ....
इन्फिनिट मिनिट आणि सेकंद .......!
तु जगलास फक्त आमच्यासाठी .......!
आमच्या हजारो पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी ......!
आमच्या अविकसित मेंदूत भीमबळ निर्माण करण्यासाठी .....!
आम्हीही थोडाथोडा प्रयत्न करतोय तु दाखविलेल्या मार्गावर धम्मप्रवास करण्याचा .....!
आज तुझ्या 129व्या जयंतीअभिवादन करण्यासाठी जमलीये अलोट गर्दी .....!
गरिबापासून अतिश्रीमंतांपर्यंत .....!
ग्लोबल पासून लोकल पर्यंत ........! वाजतायत तुझ्याच नावाचे नगारे .....!
हार ....फुले .....मेणबत्ती ......अगरबत्ती ...धुपबत्ती..
.जिकडेतिकडे तुझी अन तुझीच कीर्ती ..........!
हे बा $$$
बाबास्या $$$$
भीमा $$$$
माझ्या बापा $$$$
महामानवा$$$$$
जगतपित्या$$$$!
तुला शतशः नमन .....! वंदन ......! अभिवादन .....!
आनंद दिवाकर चक्रनारायण
मो 7058630366