मीरा-भाईंदर मनापा आयुक्तांच्या अजब निर्णयाने नागरिक चिंतेत
मिरा भाईंदर कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉटच्या दिशेने येत असतांना शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी शहरात १००% लोकडाउन २१ एप्रिल पासून सुरूवात झाली त्यात वाढ होत गेली आणि चक्क १३ दिवसाचा काळ यात जाणार आहे तसे आदेश आयुक्तांनी काढले आहेत त्यामध्ये २८ एप्रिल मध्यरात्री ते ३ मे पर्यंत बंद करण्यात येत आहेत, दरम्यान, औषधाची दुकाने नेहमीच प्रमाणे सुरू, तर दूध विक्री सकाळी ७ ते ११ पर्यंतच चालू असेल व अत्यावश्यक वस्तूच्या घरपोचसेवा सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत, पिठाची चक्की नेहमीप्रमाणे सुरू व मुस्लिम समाज वसाहतीतील बेकरी ही मध्यरात्री २ ते ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पेट्रोल पंप व लॅब, डायगोंस्टिक सेंटर पावसाळ्यापूर्वी कामे करणारे यांना यातून वगळण्यात आले आहे बाकी सर्व बंद राहतील,
एकीकडे कोरोना विषाणू लागन ची धास्ती तर हाताला काम नसल्यामुळे पैसा नाही खर्च तर सुरु आहे कुटुंब कसे चालवायचे याची चिंतेत अडकलेला शहरातला प्रत्येक नागरिक कोरोनाचे नवीन वाढते रुग्ण शहरातल्या प्रत्येक भागात आढळून येत असल्याने मजूर, कामगार हवालदिल झाला आहे. हे संकट एकदाच कधी संपणार याचे वेध प्रत्येकाला लागले आहेत. पण मीरा भाईंदरकरांनी आता गांभीर्याने घेतले नाही तर कोरोनाचा विळखा अधिक वाढण्याचा धोकाही तेवढाच जास्त आहे म्हणून आयुक्तांनी शहर १००% लॉकडाउन करण्याचे आदेश पारित केले आहे. आज आठ दिवस पूर्ण झाले आहेत पुढील पाच दिवस आणखी अशाच काळ सहन करावा लागणार आहे. याच काळात दिलासा दायक बाब म्हणजे अत्यावश्यक वस्तूच्या घरपोचसेवा दररोज सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहतील असी सोय केली आहे.
मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या आदेशाने बेकरी ची दुकाने ही २ ते ४ वाजेपर्यंत जिथे मुस्लिम समाज राहतो त्या ठिकाणी सुरू ठेवण्यात येणार आहेत. खरे पाहता वेळ ही चुकीची आहे असे अनेक जणांना वाटते आहे वेळ वाढवली पाहिजे असेही काहीजणांना वाटते तर भाजापनी तर याचे राजकारण सुरू केले आहे. या वेळी पोलीस प्रशासन व मनपा प्रशासन अधिकारी ही नसतील तर अशावेळी ही दुकाने सुरु राहिल्यास संचारबंदीचा फज्जा उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच रात्रीची वेळी असल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या अजब निर्णयामुळे नागरिकांनी झोप कधी घ्यायची हाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे शहरातील झोपडपट्टी असलेल्या विभागात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सतत १३ दिवस बंद करण्यात आल्यामुळे गरीब,मजूर,कामगार, कुटुंबाचे हाल होत आहेत कारण घरात पैसा नाही. त्यामुळे ईकडून तिकडून उधारी घेऊन आपले कुटुंब चालवणारे अनेक परिवार आहेत त्यांची मात्र या १००%लॉकडाउन मुळे त्रेधा उडाली आहे. झोपडपट्टी भागातील नागरिक थोडा वेळ का होईना किराणा दुकान खुले राहावेत जेणेकरून थोडे नगदी थोडे उधार ठेऊन आपल्या प्रपंचाचा गाडा पुढे नेता येईल अशी भावना व्यक्त करत आहे.