रेड झोनमध्ये असलेल्या ठिकाणी निर्बंध कडक होण्याची शक्यता

महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोरोनाच्या साथीत आलेल्या  जिल्ह्यांची तीन झोनमध्ये विभागणी केली आहे.१५ पेक्षा अधिक रुग्ण ज्या जिल्ह्यात मिळून आले आहेत असे जिल्हे रेड झोन मध्ये , १५ रुग्णां पेक्षा कमी असलेले ऑरेंज झोन आणि ज्या जिल्ह्यात आतापर्यंत एक ही रुग्ण आढळलेला नाही असे जिल्हे ग्रीन झोन मध्ये अशी विभागणी केली आहे. रेड झोन मध्येआलेल्या जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या अधिक आहे त्यामुळे त्या जिल्ह्यात असलेला लॉकडाऊन अधिक जास्त काळ वाढला जाऊ शकतो आणि सुरु असलेल्या लॉकडाऊन मध्ये त्याला अधिक कडक केले जाऊ शकते, म्हणून सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे मुंबई, ठाणे, पुणे, पालघर,नागपूर,सांगली, रायगड, औरंगाबाद अशी शहरे रेड झोन मध्ये आलेले आहेत या शहरात सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत  पंधरारुग्णांपेक्षा अधिक रुग्ण असलेली ही शहरे आहेत. यामध्ये संचारबंदी व लॉकडाऊन चे निर्बंध अधिक सक्तीची केली जातील अशी दाट शक्यता नाकारता येत नाही.म्हणून सर्वांनी शासनास सहकार्य करावे अशी सूचना सरकार कडून वारंवार देण्यात येत आहे.