मीरा-भाईंदर मध्ये ४८ तासात वाढले २३ रुग्ण, १००% लॉकडाउन, पहा सविस्तर माहिती

 


मीरा-भाईंदर मध्ये ४८ तासात वाढले २३ रुग्ण, १००% लॉकडाउन, पहा सविस्तर माहितीमीरा-भाईंदर मध्ये ४८ तासात वाढले २३ रुग्ण, १००% लॉकडाउन, पहा सविस्तर माहिती


मीरा-भाईंदर शहरामध्ये गेल्या ४८ तासात तब्बल २३ रुग्ण मिळून आल्यामुळे शहरात चिंता वाढली आहे. नागरिकांकडून होत नसलेले लॉकडाऊन आणि संचारबंदीचे पालन, त्यामुळेच  शहरात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. असे मत शहरातील अनेक जाणकार नागरिक व्यक्त करत आहेत.


शहरातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून वेळोवेळी सूचना देऊनही नागरिकांमध्ये जागृती,सतर्कता आणण्याचा प्रयत्न केला जात असतानाही मात्र नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद जरी ठीक असला तरीही काही नागरिक वेगवेगळे बहाने बनवून शहरात फिरत असल्यामुळे रोगाचे संक्रमण वाढताना दिसत आहे गेल्या ४८ तासांमध्ये शहरात तब्बल २३ रुग्ण आढळले आहेत तर ७२ तासात एकूण ३० रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. शहरांमध्ये कोरणा रुग्णांचा सध्या आकडा ८२ वर पोहचला असल्यामुळे शहरात शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा उद्देशाने चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश सरकारने  काढलेले आहेत. शहरात गेल्या ४८ तासात मिळून आलेल्या रुग्णांची सूची खालील प्रमाणे आहे.
(१)  वयवर्षं ४४, स्त्री,  शिवसेना गल्ली भाईंदर पश्चिम. , 
(२)  वयवर्षं११, मुलगा, शिवसेना गल्ली भाईंदर पश्चिम.,
(३)  वयवर्षं ८, मुलगा, शिवसेना गल्ली भाईंदर पश्चिम. ,
(४) वयवर्षं ३३, स्त्री, शिवसेना गल्ली भाईंदर पश्चिम ,
(५)  वयवर्षं ४२, पुरुष, पूनम सागर रोड मीरारोड पूर्व
(६) वयवर्षं ५८, पुरुष, मंगल नगर मीरा रोड पूर्व
(७) वयवर्षं २१, पुरुष,मंगल नगर मीरा रोड पूर्व. ,
(८) वयवर्षं ४९, स्त्री, साईंबाबा नगर मीरारोड पूर्व. ,
(९) वयवर्षं ५४, पुरूष, शिवसेना गल्ली भाईंदर पश्चिम. ,
(१०)  वयवर्षं ३७, स्त्री,उत्तन मोठा गांव भायंदर पश्चिम. ,
 (११) वयवर्षं  ३१, स्त्री, शांती पार्क गोकुल विलेज मीरा रोड पूर्व, (१२)  वयवर्षं २९, 
पुरुष, बालाजी हॉटेल जवळ मीरारोड, (१३) वयवर्षं ११, मुलगा, न्यु बालाजी हॉटेल जवळ  मीरारोड, (१४) वयवर्षं ३०, स्त्री, एमटी एन एल रोड़ मीरारोड पूर्व, (१५) वयवर्षं  ३२, स्त्री, श्रुति गार्डन मीरारोड पूर्व,(१६)  वयवर्षं ६१, पुरुष,काशिगाव मीरारोड पूर्व, (१७)  वयवर्षं २३, मुलगा, गौरव संकल्प मीरारोड पूर्व, (१८)  वयवर्षं २६,पुरुष, पूनम सागर मीरारोड, (१९) वयवर्षं २९ स्त्री, शांती पार्क मीरारोड पूर्व. , (२०)  वयवर्षं ५५, पुरुष, शांती निकेतन मीरा रोड पूर्व,, (२१)   वयवर्षं ४७, पुरुष,सिल्वर पार्क मीरा रोड पूर्व.,(२२) वयवर्षं १५ ,मुलगी, प्लेझेन्ट पार्क,मीरारोड पूर्व, (२३) वयवर्षं २०,मुलगा, पूजा नगर मीरारोडपूर्व .