नयानगर पोलिस ठाण्यात तीन नगरसेवक आणि  तीन समर्थकां विरोधात गुन्हा दाखल

नयानगर पोलिस ठाण्यात तीन नगरसेवक आणि  तीन समर्थकां विरोधात गुन्हा दाखल


 मीरा-भाईंदर मनपा हद्दीत मिरारोड भागात, नगरसेवकांकडून चुकीचे संदेश समाज माध्यमातून देण्यात आल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर एकीकडे कोरोना विषाणूच्या साथीला आळा घालण्यासाठी सरकार गंभीर होऊन कार्य करीत आहे, देशात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम व अपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ लागू आहे. अशा परिस्थितीत चुकीची माहिती समाज माध्यमाद्वारे देऊन  नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन नगरसेवक व त्यांच्या तीन समर्थकांवर गुद्द पोलिसानी गुन्हा नोंद केला आहे.  


 देशभरात कोरोनाचा साथीचे थैमान सुरू आहे. संपूर्ण देश या महारोगा चा सामना करत आहे. महाराष्ट्रसह मीरा-भाईंदर शहरात अनेक जाती, धर्म आणि पंथाचे लोक आनंदात वास्तव्य करत आहेत.  मिरारोड परिसरातिल नयानगर परिसरात मुस्लिम समुदाय बहुसंख्येने वास्तव्यास आहे. मुस्लीम समाजासाठी पवित्र सण म्हणून रमजान पाळला जातो संपूर्ण महीना अनेक जण रोजा (उपवास) ठेवतात . या पवित्र महिन्याची सुरवात २५ तारखेपासून सुरू झाली आहे. स्थानिक याच काळात स्थानिक नगरसेवकांनी ( कॉंग्रेस पार्टी ) समाज माध्यमातून लोकांना चुकीचे संदेश देऊन चुकीची माहिती नागरिकांत पोहोचवली आहे, याची स्थानिक पोलिसांनी गंभीरपणे दखल घेत मिरारोड पूर्व च्या नयानगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


संपूर्ण देशात, साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७, अपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ लागू आहे.  समज माध्यमातून संदेश चुकीची माहिती पसरवणे या तीन नागरसेवकांसह त्यांच्या तीन समर्थकांना ही महाग पडले आहे.  मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासी बोलणे झाले आहे आणि २७ तारखे पासून नयानगर परिसरातील  बॅरिकेट हटवले जातील परिसरातील लोकांना रीलफ दिला जाईल असा संदेश नागरिकांत समाज माध्यमाद्वारे पसरवला गेला हा संदेश या संसर्गजन्य महामारीच्या काळात धोकादायक ठरू शकतो असा आशय ठेवत पोलिसांनी खुद्द याची दखल घेत नगरसेवक सहारा अक्रम, अमजद शेख आणि नरेश पाटील यांच्यासह   त्यांच्या अन्य तीन नगरसेवक समर्थकांवर तक्रार दाखल केली गेली आहे.


 गुन्हा दाखल करण्यात आलेले हे काँग्रेस पक्षाचे  तीन नगरसेवक आहेत या नगरसेवकांत आणि स्थानिक कॉंग्रेस नेते मुजफ्फर हुसेन यांच्यात अलबेल नसल्याची  शहरात चर्चा आहे.  
महापौर निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या आदेशाचे पालन केले गेले नाही त्यामुळे पक्षाच्या वतीने 
 नगरसेवक सहारा अक्रम यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी कोकण आयुक्त सीबीडी बेलापूर यांना लेखी तक्रारही देण्यात आली आहे.


 नगरसेवक म्हणाले की, आयुक्तांशी बोलल्यानंतरच त्यांच्या मतदारांना माहिती साठी ग्रुपमध्ये संदेश पाठवले गेले आहेत.  या संदर्भात उद्या दुपारी प्रसार माध्यमांशी बोलनार असल्याची माहिती समोर येत आहे .  जनहितार्थ, जनमाहिती साठी नयानगर परिसरातील नागरिकांसाठी हा संदेश देण्यात आला होता, परंतु आमच्या कामामुळे आमच्या विरोधाकां मध्ये भिती निर्माण झाली आहे  ज्यामुळे पोलिसांवर दबाव आणून आमच्या वर गुन्हे दाखल केले आहेत असा आरोप या नागरसेवकांकडुन करण्यात आला आहे . 
 कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे मनपा आयुक्तांनी लॉकडाऊन वाढवण्या संदर्भात स्थानिक नेते मंडळी, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून पाच दिवसा साठी वाढवला असतांनाही या तीन नगरसेवकांनी मनपाह आयुक्तांशी भेट घेतल्यानंतरच तीन नगरसेवकांनी नागरिकांना  लॉकडाऊन मध्ये थोडी सूट देण्यात आली आहे असा जो संदेश समज माध्यमातून देण्यात आला होता तो चुकीचा संदेश ठरला गेल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती समोर येत आहे.