काशीमीरा विभागात जरीमरी तलावाच्या जवळ सुरू असलेल्या भाजीपाला विक्रीसाठी लावण्यात आलेल्या दुकानात एकच झुंबड उडवून संचारबंदीच्या कायद्याला धाब्यावर बसवून नागरिक गर्दी करण्यात धन्यता मानत आहेत त्यामुळे कोरोनाच्या संसर्गचा धोका वाढीचा शक्यता नाकारता येत नाही. काशीमीरा पुलिस प्रशासन, मनपा प्रशासन,स्थानिक नगरसेवक आणि महापौर यांचे होत असलेले दुर्लक्ष हे या प्रभागातील नागरिकांना धोक्याची घंटा बनू शकते असे सुज्ञ नागरिक भावना व्यक्त करत आहेत.
कोरोना रोगाच्या साथीला आळा घालण्यासाठी देशात संचारबंदी व लॉकडाउन सुरु आहे सरकारने वेळोवेळी उपाययोजना आवश्यकते नुसार करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांना आपल्या घरी राहण्यासाठी वारंवार विनंती केली जात आहे संचारबंदीचे नियम पाळले जावे नियमांचे उल्लंघन करू नये हे वारंवार सांगूनही नागरिकाकडून कायद्याच्या नियमांना हरताळ फासण्याचे काम केले जात आहे.
मनपा प्रशासनाने सार्वजनीक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी जिथे मार्केट आहे किंवा चौक आहे त्याठिकाणी मनपाने अत्यावश्यक सेवेसाठी गार्ड नेमले आहेत पण तेही बघ्याची भूमिका घेत आहेत कोणतेही गर्दी टाळण्यासाठी काम करत नाहीत. तर सस्थानिक पोलिस ठाण्यात फोन केला असताअर्ध्या किलोमीटर अंतरावर पोलिस ठाणे आहे त्या ठिकाणाहुन येण्यासाठी पोलिसांना ४० मिनिटं लागले.यामुळे हे सिद्ध होते की प्रशासन किती गंभीर आहे. अशी प्रतिकिर्या या भाजीपाला विक्री होत असलेल्या ठिकाणी लोकांना समजावंन्याचा प्रयत्न करणारे प्रत्यक्षदर्शी उपस्थित बाबुराव शिंदे यांनी पोलिस मदत पत्र सी बोलतांना दिली.
देशभरात कोरोना व्हायरसचा धोका भारतात वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे एकीकडे लोक गर्दी करण्याचं कमी करत नाहीत तर दुसरीकडे काशीमीरा हायवे पट्ट्यात जवळपास सर्वत्र झोपडपट्टी व चाळीचा परिसर आहे.या परिसरात सुदैवाने आतापर्यंत एकही रूग्ण आढळून आला नाही. जर दुर्भाग्यणे एक जरी रुग्ण आढळला तर या परिसराची परिस्थिती गंभीर निर्माण होऊ शकते याचे भान नागरिकांनी ठेवायला हवे आणि स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनि लोकांत जाऊन हे सांगणे गरजेचे आहे. पण लोकप्रतिनिधीकडून हे होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी प्रभागातील जनतेप्रती गंभीर नाहीत असे नागरिकांच्या भावना व्यक्त होत आहेत.