अनावश्यक फिरणे टाळा, घरातच सुरक्षित रहा ,सभापती विना भोईर यांचे प्रभागातील जनतेला
अवाहन
आपल्या सर्वांच्याच कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेतली जात आहे .
मिरा-भाईंदर - देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या साथीला रोखण्यासाठी सरकाने जोरदारपणे सर्वच स्थरातून प्रयत्न केले सुरू आहेत. संपूर्ण जगाला हतबल करणाऱ्या या रोगाचे संक्रमण असेच वाढत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येऊ शकतो हे पाहून प्रशासन वारंवार विनंती आवाहनआणि उपाययोजना करीत आहे.
कोरोना रोगाच्या साथीला हरवण्यासाठी मिरा-भाईंदर मनपा प्रशासन जोरदार तयारी करत आहे.कोरोनाच्या साथीचे थैमान वाढतच चालले आहे. नागरिकांत चिंता आणि भीती वाढली आहे.मीरा- भाईंदर महानगर पालिका प्रभाग क्रमांक १५ मिरारोड पूर्व च्या कर्तव्यदक्ष नगरसेविका आणि प्रभाग समिती क्रमांक ६च्या सभापती विना भोईर यांनी संपूर्ण त्यांचा प्रभाग जंतुनाशक फवारणी करवून घेतलीआहे.
देशातील कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आठवड्यापासून सुरू असलेला संचारबंदीचा काळ पाहता शहरातील विविध वस्त्यांमध्ये अनेक समस्यांना तोंड देत नागरिक जगत आहेत.
प्रभागात रहाणारा गरीब समुदाय आहे त्या समुदायाला जेवणाची व्यवस्था करण्याचे काम सुरू केले आहे. जेवढी शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सभापती विना भोईर म्हणाल्या .
प्रभागातील जनतेचा कोरोना विषाणू पासुन बचाव करण्यासाठी सभापती नगरसेविका विना भोईर यांनी सॅनेटाईझरने आणि जंतुनाशक औषध फवारणी मनपाच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या जवानांच्या साह्याने संपूर्ण १५ नंबर प्रभागात स्वतः जबाबदारीने उभेराहूंन करून घेतली.
आपला विभाग कोरोना विषाणू पासून अलिप्त राहील. त्याला शिरकाव करण्यास जागा देऊ नका बिना कामाचे बाहेर पडू नका वेळ गंभीर आहे. काहिदीवस त्रास होईल पण या संकटापासून शहराला त्याच बरोबर राज्य आणि देशाला वाचवू शकतो.हीच खरी देशभक्ती होईल . सरकार आपल्या परीने काळजी घेत आहे तसेच तुम्हीही काळजी घ्या, कोणालाही आजार होणार नाही.याची काळजी घेतली जात आहे.तरी कृपया करून विभागातील कोणत्याही नागरिकांनी आपल्या घराबाहेर निघू नये आणि घरातच सुरक्षित राहावे आम्ही हे सर्व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी करत आहोत,असे आवाहन प्रभाग समिती क्रमांक ६ च्या सभापती विना भोईर यांनी प्रभागातील आणि शहरातील नागरिकांना केले आहे.