तरुणाकडून चारशे कुटुंबाना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप

तरुणाकडून चारशे कुटुंबाना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप 


मीरारोड पूर्व : 


           कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची आर्थिक परिस्तिथि मुळे होणारी उपासमार बघता भाईंदर पूर्वच्या गोड़देव गाव परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय महेश म्हात्रे या तरुणाने अश्या लोकांना अत्यावश्यक वस्तु पुरवन्यास सुरवात केली आहे.आजवर ४०० हुन अधिक परिवारांना महेश याने मदत केली असून कोणत्याही प्रकारची स्टंट बाजी किंवा फोटो बाजी न केल्यामुळे त्याच्या या मदतीची सर्वत्र चर्चा  होत आहे.महेशने आपल्या विभागातील गरजूना सुरुवातीला काही दिवस  खिचड़ीचे  वाटप करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर गरजुंना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप करण्यास त्याने सुरवात केली यामध्ये २ कीलो गहु,२ कीलो तांदूळ,२ किलो साखर,तेल,पीठ,डाळ यासारख्या रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तुंचा समावेश होता.  विशेष म्हणजे  लॉकडाऊन झाल्यापासून  त्यांचा हा उपक्रम सुरू असून महेश दिवस-रात्र परिसरात फिरुण कोणी उपाशी आहे का याचा शोध देखील घेत आहे.महेश लोकां पर्यंत अत्यावश्यक वस्तु पोहचाव्या या करता मोठी मेहनत घेत आहे.दरम्यान सोशल डिस्टनसिंगचे भान राखत हा उपक्रम सुरू ठेवला आहे.तसेच जेवणापूर्वी हात धुण्यासाठी  सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जाते.