डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन दुप्पट करा.....पोलिसांना ५० लाखांचे विमा सुरक्षा कवच द्या
देवदूतांचा सन्मान करा, आमदार श्री प्रताप सरनाईक यांची सरकार कडे आग्रही मागणी
Covid 19 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाउन झालाय, सरकार दररोज लोकांना स्वतःचे जिव वाचवायचे असतील तर घरीच थांबा अश्या सूचना देतं आहे. मात्र त्याचवेळी स्वतःच्या जिवाची पर्वा नं करता डॉक्टर, नर्स, परिचारिका व आरोग्य सेवेतील कर्मचारी देशसेवेसाठी समर्पित भावनेनी कामं करतायत.
यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारच्या धर्तीवर शासकीय व अशासकीय सेवेतील डॉक्टर, परिचारिका व आरोग्यसेवेत कर्मचाऱ्यांचे वेतन दुप्पट करा अशी आग्रही मागणी व तसे पत्रं शिवसेनेचे आमदार श् प्रताप सरनाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजित पवार यांना पाठवले आहे.
पोलिसांना ५० लाखांचे विमा सुरक्षा कवच द्या
अहोरात्र आपल्याला घरी सुरक्षित ठेवण्यासाठी जो घराबाहेर उभा असतो तो पोलीस. एरवी काही लोकं पांडू म्हणून पोलिसांची टिंगल टवाळी करतात, जमात्र आज तेच पोलीस पांडुरंगा सारखे आपल्या दाराबाहेर उभे राहून आपलं संरक्षण करतायत.त्यांच्या वाटा खूप महत्वाचा आहे. म्हणूनच पोलिसांना ५० लाखांचे विमा सुरक्षा कवच घ्या अशी आग्रहाची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने सरकार कडे करण्यात आली आहे.
आमचे ३०% नव्हे, तर ५०% वेतन कापा. पण माझ्या डॉक्टर, नर्स व पोलिसांना सन्मान करा
कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमदारांच्या वेतना मध्ये ३०% कपात करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे कि, आमचे वेतन ३०% टक्केच काय तर ५०% कपात करा..... पण या देवदूतांचा मात्र सन्मान करा