डोंबिवलीत एटीएम रूममध्ये स्वच्छतेचे तीन तेरा

डोंबिवलीत एटीएम रूममध्ये स्वच्छतेचे तीन तेरा


देशात पसरलेली कोरोनाच्या साथीचा भीती आहे प्रत्येक जण आपापल्या घरी,परिसरात,जंतुनाशक फवारणी करून रोगाला थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र तेच नागरिक घराच्या ,परिसराच्या बाहेर पडले की काय करतात याचे उदाहरण डोंबिवलीतील अनेक बँकेच्या एटीएम रूममध्ये गेल्यावर किती स्वच्छतेची काळजी घेतानां दिसत नाहीत पाहायला मिळालेआहे. हे एका सुजाण नागरिकांने आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केले आहे.



खरंतर जग विज्ञानामुळे जवळ आले आहे आम्ही सगळे स्मार्ट झालो आहोत. आम्ही स्मार्ट सुविधांचा फायदा घेणे जाणतो पण त्या परिसराची निगा राखणे मात्र टाळत असतो. असा प्रकार  प्रमोद पवार यांच्या निदर्शनास आला तो डोंबिवलीत
आज सकाळीच एटीएम मधून पैसे काढून घेण्यासाठी एटीएम मध्ये गेलो तेथील पडलेला कचरा पाहून त्यांना फार वाईट वाटले तर त्यांनी दुसऱ्या ठिकाणाचे  एटीएम  रूम बघितले तिथे ही तीच अवस्था होती शहरातील अनेक एटीएम मध्ये अशीच परिस्थिती आहे असे प्रमोद पवार यांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या भीती मुळे प्रत्येक सुजाण नागरिक आपले घर आपला परिसर स्वच्छ ठेवतो आहे पण एटीएममध्ये गेल्यावर आपला व्यवहार पूर्ण झाल्यावर मिळणारी पावती कचरा कुंडीत न टाकता तिथंच टाकून निघून जातो
एवढेच काय जे एटीएम मध्ये पैसे टाकतात ते सुद्धा पैशाच्याबंडलाचे कागद खालीच फेकून निघून जातात.
सुजाण नागरिक म्हणून आपण हे टाळण्यासाठी सर्व शासकीय सेवा पुरवणाऱ्या साधनांची आपण वापर केला पाहिजे आणि शहराला स्वछ सुंदर ठेवले पाहिजे.  स्मार्ट सेवा उपलब्ध करून देणाऱ्या साधनांचा योग्य वापर करू या आणि त्यांची  निगा ठेवने गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया प्रमोद पवार यांनी बोलतांना व्यक्त केली आहे.
शहरातील नागरिकांनी या बाबीकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे त्याचबरोबर शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे ते सर्वांनी पार पाडावे आणि संकटमय परिस्थिती प्रत्येकाने ओळखुन प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे असे आवाहन त्यानीं केले आहे.