रेशन वाटपा दरम्यान दुकानांवर होतोय या कारनामुळे वाद
पोलिस मदत पत्र (मिरा भाईंदर )
कोरोनाच्या महामारीची साथ देशात उग्र रूप धारण करत आहे ह्या कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी लॉकडाउन ,संचारबंदी लागू करण्यात अली आणि कोणताही गरीब,मजूर,कामगार उपाशीपोटी राहू नये म्हणून सरकारने स्वस्तधान्य दुकानातून तीन महिन्याचे धान्य एकाच वेळेस मिळणार असल्याचे यापूर्वी सरकारने जाहीर केल्याने शहरातील रेशन दुकानांवर गैरसमज होऊन वाद निर्माण होत आहेत .
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली व लॉकडाउन सुरू झाले. देशातील गरीब मजूर,कामगार,ज्यांचे हातावरचे पोट आहे असा समुदाय मोठ्याप्रमानात शहरात आहे. दारिद्र्य रेषेखालील,अल्प उत्पन्न धारक, यांच्यासाठी सरकार मान्यता प्राप्त शिधा वाटप दुकानातून अन्नधान्य अल्प दरात दिले जाते, सरकारने संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात कोणीही उपाशी पोटी राहू नये म्हणून रेशनकार्ड धारकांना तीन महिन्याचे रेशन एकत्र दिले जाईल घोषणा केली होती . राज्य सरकारने सरकारी स्वस्त धान्य दुकानात तीन महिन्याचे धान्य मिळेल अशी अपेक्षा नागरिकांची होती त्यामुळे स्वस्त धान्यदुकानंत गर्दी केली आहे पण सरकार ने दुकानदारांना अन्न व पूरवठा विभागाला दिलेल्या आदेशामध्ये फक्त एप्रिल महिन्याचे धान्य वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या रेशन तीन महिन्याच्या ऐवजी एका महिण्याचेच मिळत असल्याने दुकानदार आणि ग्राहक यांच्यात गैर समज निर्माण झाल्यामुळे धा ग्राहक व दुकानदरामध्ये वाद होत असल्याचे मिरा भाईंदर शहरात पहायला मिळत आहे .
नागरिकांना 2 रुपये किलो दराने गहू , तर तांदूळ 3 रुपये किलो दराने व पंतप्रधान योजने अंतर्गत प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ देण्याची घोषणा केली होती .
मिरा भाईंदर शहरात सर्व लाभार्थीसाठी दर महिन्याला ३ लाख १० हजार ८५२ क्विंटल धान्याचे वाटप केले जाते . अन्न व पूरवठा विभागाला दिलेल्या आदेशामध्ये फक्त एप्रिल महिन्याचे धान्य वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .मात्र नागरिकांना तीन महिन्याचे धान्य एकाच वेळेस मिळणार असल्याचे यापूर्वी सरकारने जाहीर केल्याने शहरातील रेशन दुकानांवर गैरसमज होऊन वाद देखील होत आहेत .