या ठिकाणी ३ में नंतरही वाढू शकतो लॉकडाउन

या ठिकाणी ३ में नंतरही वाढू शकतो लॉकडाउन


कोरोना महामारिच्या संकटामुळे संपूर्ण देशात  संचारबंदी सह लॉकडाऊन  सुरू आहे. जवळपास  दोन टप्प्यात लॉकडाऊन चा काळ हा ४० दिवसाचा  आहे  या काळात  देशातील नागरिकांनी  सरकारला सहकार्य करत कोरोनाच्या या विषाणूला रोखण्यात यश मिळवले आहे. पण काही ठिकाणी  या विषाणूने थैमान घातल्यामुळे महाराष्ट्र मध्ये  मुंबई,पुणे,ठाणे,पालघर  जिल्ह्यामध्ये  धुमाकूळ माजवल्यामुळे  या शहरात लॉकडावून वाढण्याची दाट शक्यता आरोग्य मंत्र्यांकडून  वर्तवली जात आहे. 


सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या ३ मे पर्यंत राहणार आहे. सरकार या संदर्भात लवकरच निर्णय घेईल या मध्ये देशासह राज्यातील लॉकडाऊन कदाचित मागेही घेतला जावू शकतो. काही प्रमाणात या लॉकडाउन मध्ये सूट देऊन काही प्रमाणात व्यवहार सुरू केले जातील पण मुंबई आणि पुण्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या पाहता आणि शहरात दररोज वाढत असलेले आकडे पाहता या जिल्ह्यातील शहरात पुढील काही काळ लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. कदाचित या शहरांमधील कंटेन्मेंट झोनपर्यंत हा निर्णय मर्यादित असू शकतो, अशी शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्त वृत्तसंस्थेशी बोलताना ही शक्यता वर्तवली आहे.  त्यामुळे ३मेनंतर सुद्धा आणखी काही दिवस घरात थांबावं लागण्याची शक्यता दाट आहे.


ते म्हणाले कि, 'कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये या कारणानेच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.
पण जर प्रादुर्भाव थांबत नसेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय काहीही पर्याय नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. सध्या काही ठिकाणी चाळीच्या वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना संक्रमण झालेले रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, ही सध्याची चिंतेची बाब आहे. सर्व कंटेन्मेंट झोन पूर्णपणे बंद आहेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. गरज पडल्यास ३ मेनंतर फक्त मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये आम्ही आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवू शकतो,' असं त्यांनी सांगितलं. शहरातील सुज्ञ जागरूक नागरिकांना ही लॉकडाउन वाढवला तरच आपण या महामारीला रोखू शकतो असे अनेकांना वाटत आहे. पण अनेकांचे पोट हातावर असलेल्या नागरिकांचे मात्र हाल वाढत आहेत परस्थिती गंभीर होत आहे. अनेकांचे संसार रोजमजुरी करून चालतात त्यांच्या विषयी सरकारने  आवश्यक ती भूमिका घेणे गरजेचे आहे. दिवाळी पासून ते जून महिन्यापर्यंत काम करून संपूर्ण पावसाळा घरी राहून खाणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे पण या वर्षी जानेवारी महिन्यातच ही महामारी देशात आली नेमक्या काम मिळण्याच्या काळातच काम बंद झाल्याने कामगार आणि मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ शकते अशा भावना अनेक जण व्यक्त करत आहेत.