लॉकडाऊनच्या काळात उन्हाळी पदार्थ बनवण्यात महिला व्यस्त 

लॉकडाऊनच्या काळात उन्हाळी पदार्थ बनवण्यात महिला व्यस्त


मीरारोड पूर्व :


          कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे.लॉकडाऊन मुळे सर्व चाकरमाऱ्यांना घरात बसावे लागले आहे.पुरुषांप्रमाणे नोकरी करणाऱ्या महिला देखील घरात लॉकडाऊन झाल्या आहेत .लॉकडाऊच्या संधीचा नोकरदार महिलांना सुट्टी असल्याने त्याचा फायदा घेत त्या उन्हाळी खाद्यपदार्थ तयार करण्यात व्यस्त झाल्या आहेत. नोकरदार महिलांना सुट्टी नसल्याने  दरवर्षी उन्हाळ्यात सुट्टी घेऊन उन्हाळी पदार्थ करायला लागत होते.मग त्यात पापड ,चिप्स आदी उन्हाळी पदार्थांचा  समावेश असतो .उन्हाळ्यात कडक उन्ह लागत  असल्याने पापड चांगले वाळून वर्षभर सुरक्षित ठेवता येतात .मात्र या वर्षी लॉकडाऊन मुळे घरी बसून वेळ जात नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात तयार करण्यात येणारे  उन्हाळी पदार्थ महिला वर्गाने घरात बसून सुट्टीचा सर्वाधिक फायदा घेत कंटाळत असल्याने आता बनवायला सुरवात केली आहे.लॉकडाऊन मुळे लाहान मुले ,पुरूष सर्वच जन घरी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे जास्त घरकाम देखील नसते. पुरुष वर्ग व लहान मूल इकडे तिकडे करून फिरून वेळ घालवतात मात्र महिलांना घरिच बसन्या शिवाय पर्याय नसल्याने त्यांनी उन्हाळी पदार्थ बनवन्यास सुरवात केली आहे.कोरोनाचे सावट आल्याने 21 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन केल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे. मिरा भाईंदरच्या राई, मुर्धा, मोर्वा , काजूपाडा, चेना, माशाचा पाडा, पेणकरपाड्यात या गावातील महिला पापड व चिप्स तयार करताना दिसून येत आहेत . अशीच परिस्थिती जिल्ह्यातील महाराष्ट्रात अन्यत्र ठिकाणी सुरू आहे.