मीरा-भाईंदर शहरात पोलिसांकरिता निर्जंतुकीकरण गाडी
मीरारोड पूर्व :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरू असलेल्या संचारबंदीत कडक पोलिस बंदोबस्त आहे. सतत नागरिकांचा संपर्कात यावे लागते त्याच बरोबर सतत रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावत असतात. या संसर्गजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव पोलिसांत फैलऊ नये या रोगाच्या धोक्यातून पोलिसांचे संरक्षण व्हावे. लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दिवस रात्र कोणतीही भीती न बाळगता आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांच्या पैकी कोणाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून शासनाकडून आता सर्व पोलिसासाठी निर्जंतुकीकरण वाहन उपलब्ध करुण देण्यात आली आहेत. मीरा भाईंदर मध्ये देखील पोलिसासाठी सोमवारी निर्जंतुकीकरण वाहन शहरात दाखल झाले आहे.
देशात अनेक ठिकाणी पोलिस कर्मचारी यांची काळजी घेतली जात आहे. अनेक शहरात निर्जंतुकीकरण गाडी देण्यात आली आहे. तशीच मिरा-भाईंदर शहरातील पोलिसांसाठी ही निर्जंतुकीकरण गाडी दाखल झाली आहे. दिवसभर उन्हात उभे राहून आपले कर्तव्य बजावणारे पोलीस यांचा अनेकांशी सबंध येत असतो व त्यांच्या करता सरकार कडून कोणतेही सुरक्षा किट, साधने उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत.त्यामुळे त्यांची काळजी घेणे महत्वाचे असल्यामुळे निर्जंतुकीकरण वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. निर्जंतुकीकरण हे वाहन शहरात सर्वत्र फिरणार असून पोलीस नाकाबंदी करून कर्तव्य बजावत असतील अशा सर्व ठिकाणी हे वाहन जात आहे. इतकच नव्हे तर प्रत्येकाला या वाहनामध्ये प्रवेश बंधनकारक करण्यात आला आहे. १५ ते २० सेकंड आतमध्ये उभे राहताच सॅनिटायजर फवारणी सुरू होते.हे वाहन दिवसभर मीरा भाईंदर शहरात फिरत असून पोलिसांचा कोरोनाच्या विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यास मदत होत आहे.
पोलिसांना रस्त्यावर उभे राहून हात धुणे व सॅनिटायझर वापरने शक्य होत नाही. हे वाहन उपलब्ध झाल्यामुळे पोलिसांना फायदा होत आहे. या सुविधेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.