कोरोना तूच हरणार

 


कोरोना तूच हरणार


जगभराचा प्रवास करत
नवे भक्ष्यं शोधण्याच्या इराद्याने
शेवटी धडकलास भारतात
आणि आनंदून गेलास थोड्याश्यां
शिकारीने....
काय वाटले? तुझ्याशी कोण लढणार??
तुला विश्वासाने सांगतोय कोरोना...
या लढाईत तूच हरणार...
आम्ही भारतीय तुला इथेच गाढणार...


कोरोना...
जातीय,धार्मिक,सामाजिक,राजकीय खोल्यांमध्ये आम्ही बंदिस्त आहोत आधिपासून...
म्हणूनच टाळेबंदीचे तंत्र जाणून आहोत
तुला कल्पनाही नसेल तेंव्हापासून...


तुला काय वाटले त्या टाळ्यां,शिट्ट्यां,
मिरवणूकां,दिवेलागण तुझ्या
स्वागता साठी होती??
'इथेच फसलास तू वेड्यां!' ही तर तुझ्याच विरूद्धच्या युद्धाची पूर्वतयारी होती.
म्हणूनच, तुला पुन्हा एकदा विश्वासाने सांगतोय...'कोरोना'
या लढाईत तूच हरणार...
आम्ही भारतीय तुला इथेच गाढणार...


कोरोना...
तुला सहज संपविल्यावर मजा नाही युद्धाची...
एव्हढे चक्रावून सोडू की, पून्हा हिम्मत करणार नाहीस येण्याची...
'हसतोस काय वेड्यां!' अजूनही नाही का कळत?
तुझा धर्मही बदललाय तुझ्याच नकळत!


तुला काय वाटले आमच्यातील मतभेद,चिलफेक,बेजबाबदार वर्तन,माध्यमांतील अफवा ही तुझ्या जमेची बाजू आहे???
'पुन्हां एकदा फसलास वेड्यां!' ही तर तुला संभ्रमित करून हरविण्याची आमचीच एक खेळी आहे.
म्हणूनच, अजून एकदा विश्वासाने 
सांगतोय...'कोरोना'
या लढाईत तूच हरणार...
आम्ही भारतीय तुला इथेच गाढणार...


कोरोना...
तुझा अंत निश्चित आहे खूप केलीस महामारी...
आता तरी मान्य कर आमचे देवदूत
(डाँक्टर,नर्स, पोलीस, प्रशासन, कर्मचारी)
तुला पडताहेत भारी...


काय म्हणालास??
आम्हाला धडां शिकवायचां होता...
आता स्वत:चीच काळजी घे...'कोरोना'
जबाबदार नागरीकत्वं,सहकार्य,एकता, वैज्ञानिकता,स्वच्छतां, मानवतां... 
असे बरेच  पाठ आम्ही गिरवीत आहोत
नव्याने...
मानवतजातीच्या अस्तित्वासाठी!


म्हणूनच, तुला आत्मविश्वासाने 
सांगतोय... 'कोरोना'
या लढाईत तूच हरणार...
आम्ही सर्व भारतीय तुला इथेच गाढणार...


                        ✒️ सुनिल चौरे   


        मोबाईल नंबर 8652277230