जनसेवा सोशल फॉउंडेशन पार पाडत आहे सामाजिक भूमिका
अनिल सकपाळ-सध्या देशावर कोरोना वायरस चे संकट ओढावले आहे,देशात आणिबाणी सदृश परिस्थिति निर्माण झाल्याने कर्फ्यू लागू आहे,या कर्फ्यू मुळे कोरोना वायरस ची साखळी रोखण्यासाठी बरीच मोठी मदत होणार आहे.या सद्यस्थितित सर्वचजण भरडले जात असून पोलिस प्रशासनिक अधिकारी,कर्मचारी,आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्टर्स,पत्रकार,तसेच सेवाभावी संस्था या परिस्थितीत मोलाची भूमिका बजावताना दिसत आहे.
अशीच एक सेवाभावी संस्था जनसेवा सोशल फाउंडेशन सध्या आपली सामाजिक भूमिका हिरीरिने निभावताना दिसत आहे,एम.एस.शेख हे या संस्थेचे अध्यक्ष असून देशव्यापी भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष देखील आहेत.देशभर कर्फ्यू सुरु झाल्यावर रस्त्यावर तैनात असलेले पोलिस अधिकारी तसेच सार्वजनिक परिवहन सेवेचे वाहक,चालक,आरोग्य सेवक जे जास्त वेळ या काळात लोकांच्या संपर्कात येत आहेत अशा कोरोनाविरांची सैनिटाइजर,मास्क,या अशा अति आवश्यक वस्तुंचे वितरण संस्थेचे अध्यक्ष एम.एस. शेख़ आणि जनसेवा सोशल फॉउंडेशनच्या इतर अजुन कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले,तर दुसरीकडे या कर्फ़्यूच्या काळात हातावर पोट असलेल्या कामगार वर्गाचिहि तितकीच काळजी घेतली जात असून ठिकठिकाणी कामगार वर्गाला धान्यवाटप केले जात आहे,नुकतेच गोरेगाव पश्चिम येथील प्रेमनगर या परिसरात जिथे कामगार कोरोना वायरस च्या परिणामाने मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले आहेत आणि सध्या दोन वेळच्या जेवनाची भ्रांत ज्याना पडली आहे अशा ठिकाणी धान्यवाटपचा कार्यक्रम पार पडला.यावेळी शेख यांच्यासह मुगीस खान,विनोद गिरी,संजय मिश्रा,अनिल सकपाळ,दीपक उपाध्याय आदि उपस्थित होते
जनसेवा सोशल फॉउंडेशन पार पाडत आहे सामाजिक भूमिका