कोरोनाच्या धर्तीवर सार्वजनिक जयंती उत्सव साजरे करू नका -प्रकाश आंबेडकर नेते वं.ब.आ.

कोरोनाच्या धर्तीवर सार्वजनिक जयंती उत्सव साजरे करू नका -प्रकाश आंबेडकर नेते वं.ब.आ.



मुंबई: देशात महाराष्ट्रराज्य आणि त्यातल्या त्यात मुंबईसह उपनगरे, नवी मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्ह्यतील काही भाग आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे हे कोरोनाचे हॉस्पॉट केंद्रे ठरतआहेत कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यानं संसर्ग टाळण्यासाठी घरीच राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक जण याकडे गांभीर्यानं पाहत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन न करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील जनतेला ११ एप्रिलला महात्मा फुलेंची, तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घरीच साजरी करावी हे महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढ होत आहे. राज्यात कोरोनाचे साडे आठशेपेक्षा अधिक रुग्ण आहेत.
११ एप्रिलला महात्मा फुलेंची, तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या दोन्ही जयंत्या घरातच साजऱ्या करण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. 'ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण घरातच साजरी करावी, असं आवाहन मी सर्व फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला करतो. जयंती कशी साजरी केली त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियामार्फत दाखवता येतील. पण कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक जयंती साजरी होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे', असं आवाहन आंबेडकर यांनी केलं.