कोरोनाग्रस्त रुग्णाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केलेल्या रणरागिणी महापौराचें मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन करून केले कौतुक
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला देशासह,राज्यावर उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय सेवेतील अनुभव असलेल्या निवृत्त झालेल्या किंवा शिक्षण पूर्ण झालेल्या नागरिकांनी समोर येऊन मदतीचा हात पुढे करावा असे आवहान केले. त्या आवहानाला राज्यातील अनेकांनी प्रतिसाद देत सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली त्यात एक नाव अशेही आहे,की त्या स्वतः महापौर असतानाही कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतात त्या म्हणजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी आयुक्तांना लेखी पत्र देऊन कोरोना ग्रस्तांची सेवा करण्याची इच्छा प्रकट केली त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदय यांनाही ट्विट द्वारे इच्छा व्यक्त केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यांनी केलेल्या ट्विट ची स्वतः दखल घेत त्यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. जनतेच्या हितासाठी आपण ईच्छा व्यक्त करण हे कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्र्यांनी विनिता राणे यांचे अभिनंदन केले. खरंतर मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर विनिता राणे भाउक झाल्या होत्या, त्यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा त्या म्हणाल्या की,माझ्या आयुष्यातील मी नायर रुग्णालयात ३२ वर्ष नर्स म्हणून सतत रूग्णांची सेवा केलेली आहे. तर सध्या देशासह, राज्यावर आणि माझ्या शहरावर आलेलं हे कोरोनाच महासंकट दूर करण्यासाठी मी या शहरातील नागरिक म्हणून माझ्या शहरातल्या कोरोना ग्रस्तांसाठी मला खारीचा वाटा उचलण्याच जर भाग्य मिळत असेल तर ती संधी मी का सोडावी असे मला वाटते, ही संधी मला माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आवहानाने मिळाली आहे व त्या संधीचं सोनं करणं आणि कोरोना ग्रस्तरुग्णाची सेवा करणे याचं मला भाग्य लाभेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. अशा भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
विनिता राणे आणि त्यांचे पती विश्वनाथ राणे हे एका लग्नाच्या कार्यक्रमात हजर झाल्यामुळे त्यांना दोघांनाही १४ दिवस होम कोरोनटाईन मध्ये राहावे लागले होते, महापौर विनिता राणे यांनी सेवा करण्याची इच्छा प्रगट केल्यामुळे शहरातून आणि राज्यांतून त्यांच्यावर समाज माध्यमातून अभिनंदनाचा वर्षांव सुरू आहे.
"मानव सेवा हीच ईश्वर सेवा" हे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो पण तो प्रत्यक्ष कृतीत मात्र उतरवण्याचा प्रमाणिक पणे प्रयत्न करत नाही.
सध्याच्या संकटमय काळात प्रत्येकजण आपला जीव मुठीत धरून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी घरात बसून आहे. पण ज्याच्या अंगी सेवा वृत्ती असते आणि ज्यांनी, रुग्णात देव मानाला त्यांची रुगणांची सेवा करण्याची धडपड सतत सुरूअसते हे या घटनेने सिद्ध होतांना दिसत आहे.
प्रतिक्रिया
मी नायर रुग्णालयात ३२ वर्ष नर्स म्हणून सतत रूग्णांची सेवा केलेली आहे. तर सध्या देशासह, राज्यावर आणि माझ्या शहरावर आलेलं हे कोरोनाच महासंकट दूर करण्यासाठी मी या शहरातील नागरिक म्हणून माझ्या शहरातल्या कोरोना ग्रस्तांसाठी मला खारीचा वाटा उचलण्याच जर भाग्य मिळत असेल तर ती संधी मी का सोडावी असे मला वाटते, ही संधी मला माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आवहानाने मिळाली आहे व त्या संधीचं सोनं करणं आणि कोरोना ग्रस्तरुग्णाची सेवा करणे याचं मला भाग्य लाभेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. अशा भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
विनिता राणे (महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका)