मीरा-भाईंदर मनपाचा गलथान कारभार, अलगीकरन कक्षात गैरसोय व निष्काळजीपणा
मीरा-भाईंदर प्रशासनाचा गलथान कारभार सुरू आहे. देशाची चिंता वाढवलेल्या कोरोनाच्या साथीने हवालदिल केलेल्या नागरिकांना मीरा-भाईंदर प्रशासन मात्र हलक्यात घेतांना दिसत आहे. मीरा भाईंदरमधील अलगीकरन कक्षात ठेवलेल्या नागरिकांना तपासणी साठी सात दिवसांपासून डॉक्टर गेले नसल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराने मनपाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
राज्यात कोरोनाचे जोरदार थैमान सुरू आहे, कोरोनाचा विषाणू गुणाकार करण्याच्या मार्गावर आहे तर तर मनपा प्रशासन या गंभीर परस्थिती भोंगळपणे कारभार चालवताना दिसत आहे. भाईंदर गोल्डन नेस्ट येथे कोरोनाचे अलगीकरन कक्ष उभे केले आहे त्या कोरोना संदर्भात अलगिकरण कक्षात ठेवलेल्या व्यक्तीना वेळेवर जेवण मिळत नाही. त्यांची कोणीही काळजी घेत नाही तर त्यांच्यासाठी डॉक्टर सुद्धा तपासणीसाठी येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर अलगीकरन कक्षात असलेल्या नागरिकांना पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नसून झोपायला बेडची व्यवस्था सुद्धा नाही. असी परस्थिती निर्माण झाली आहे. हा प्रकार सुरू असल्याचे समजताच अलगीकरन कक्षाच्या ठिकाणी आमदार गीता जैन यांनी अलगीकरन कक्षास भेट दिली तर त्यांना हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला म्हणून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अलगीकरन कक्षामध्ये असलेल्या नागरिकांनी होत असलेल्या असुविधा बाबत आमदारांना समोर समोर बोलून दाखवल्या नागरिकांच्या तक्रारीवरून गीता जैन यांचा रागाचा पारा चढलेला पाहयेला मिळाला. अलगीकरन कक्षात असलेल्या नागरीनकांची होत असलेली हेळसांड पाहून त्या चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या तिथे होत असलेल्या निष्काळजीपणा बाबत त्यांनी डॉक्टर तसेच मनपा कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतलेला दिसून आला.
भाईंदर गोल्डन नेस्ट येथे अलगीकरन कक्ष बनावण्यात आले आहे.त्यामध्ये एकूण १०८ नागरिकांना ठेवण्यात आले असून त्यात ८ लहान मुलांचा समावेश आहे. या सर्व नागरिकांना "होम पाठवा त्यांचे घरीच अलगीकरन करा सेवा देता येत नसेल तर त्यांची दुर्दशा करू नका आणि ती मी करू देणार नाही अशी ताठर भूमिका घेतली, पोलिसांना बोलवा. माझ्या गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण यांना अस इथे ठेऊ देणार नाही" असा आक्रमक पवित्रा आमदार गीता जैन यांनी घेतलेला दिसून आला.