मीरा-भाईंदरकरांची काळजी वाढली कोरोना रुग्णांत होत आहे वाढ,
एकाच दिवशी वाढले १०रुग्ण
मीरा-भाईंदर शहरात कोरोना साथीचा कहर कमी होण्याचे नाव घेईनासा झाला आहे, दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे आतापर्यंत घरातील रुग्णांची संख्या ६९ एवढी झाली आहे काल दिवस भरातली एकूण संख्या ७ होती तर आज दिवसभरामध्ये १० रुग्णांची वाढ झालेली आहे. त्यामुळे दररोज नवीन नवीन रुग्णांची संख्या निश्चितच शहरात चिंतेचे वातावरण निर्माण करणारी परस्थिती आहे.
-
नव्या रुग्णांची भर पडत असतानाच आत्तापर्यंत दोन जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. मीरा-भाईंदरकरांना दिलासा देणार बाब म्हणजे ६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
मीरा-भाईंदर शहरात कोरोनाचा एप्रिल पहिला रुग्ण सापडला आणि त्या दिवसा पासून कोरोनाग्रस्त रुग्णाची वाढ थांबत नाही.प्रत्येक उजडणारा दिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ घेऊन येत आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 3 मे पर्यंत संचारबंदी आणि लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. संचारबंदी लागू करून शासनाने काही प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. नागरिकांमध्ये जागरूकता जरी आली असली तरीही काही टवाळगीर मंडळी व नशेची लत लागलेली मंडळी जाणीवपूर्वक नशेच्या वस्तू,सामानाच्या शोधात फिरतांना दिसत आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली तर कधी पोलिसांची नजर चुकवून वेगवेगळ्या बहाण्याने फिरत आहेत. याविरुद्ध पोलिसांनी मोहीम घेतली आहे. शहरात आतापर्यंत १६० पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत तर अनेकावरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.