भारतीय बौद्ध महासभेकडू कडून तमाम बांधवांना जयंती करिता जाहीर आवाहन

14 एप्रिल हा दिवस भारतीया बरोबर जगातील कोट्यावधी जनतेच्या आनंदाचा सणासारखा साजरा केला जाणारा दिवस आहे. याच दिवशी भारत देशाचे महान सुपुत्र जगातली एक नंबर ठरलेल्या भारतीय लोकशाहीच्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्या जगावरती कोसळलेले कोरोना साथीचे संकट पाहता आणि देशांमध्ये कोरोना संक्रमनाने घातलेले थैमान पाहता " दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा" यासंस्थेच्या माध्यमातून संस्थेचे कार्याध्यक्ष  आणि परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे  नातू भीमराव यशवंत आंबेडकर यांनी तमाम भारतीयांना व बौद्ध बांधवांना एक परिपत्रक काढून आवाहन करण्यात आले आहे की, प्रत्येक बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, जन्मदिवस आपापल्या घरीच साजरा करावा कारण देशात कोविंड १९ ची साथ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे जयंती निमित्ताने सार्वजनिक उत्सव साजरे केले जाऊ नयेत. कोणतेही प्रबोधनाचे कार्यक्रम सार्वजनिक रित्या ठेवले जाऊ नये.असे अवहान भारतीय बौद्ध महासभे कडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि देशातील बहुजनांचे नेते आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनीही काल समाज माध्यमातून जनतेला घरी जयंती साजरी करण्याचे आव्हान केले होते. त्याचबरोबर शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून या वाढत चाललेल्या रोगराईला आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याचे अवहान तमाम भारतीयांना केले होते. तरी सर्वांनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. देशावरच्या आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी त्याचा बीमोड करण्यासाठी घरी राहून यासाठीचा मुकाबला करावा आणि आपली देशभक्ती, देशावरचे प्रेम बाबासाहेबांच्या वाक्याप्रमाणे मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिम ही भारतीय आहे हा संदेश देशासह जगभरात द्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे.