एकीकडे संचारबंदी आणि दुसरीकडे पगार नाही दोन्हीच्या कचाट्यात भरडला  जातोय शिक्षक


 


 


 


 


 एकीकडे संचारबंदी आणि दुसरीकडे पगार नाही दोन्हीच्या कचाट्यात भरडला  जातोय शिक्षक


 


अभिनव कॉलेजचे शिक्षक व कर्मचारी चार महिन्यापासून पगाराविना;कर्मचाऱ्याचे पंतप्रधानना साकडं


मीरारोड पूर्व :


 शिक्षक हा देशाला घडवण्यात फार मोलाचा वाटा उचलनारा वर्ग मानल्या जातो. तरुण हा देशाचा कना मानला गेला आहे.त्या तरूणांना घडवण्यासाठी शिक्षकांचे मोठे योगदान असते त्या शिक्षकांचा पगार न केल्यामुळे  भाईंदर पूर्व भागातील घोडदेव नाक्याजवळ असलेल्या  अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ संचालित अभिनव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शीक्षक हैंरान झालेे आहेत.


देशात सुरू असलेली संचारबंदी आणि संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे त्रासलेला आहे. भाईंदर पूर्वला असलेल्या अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ संचालित अभिनव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात  विना अनुदानित तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा गेल्या ४ महिन्यापासून पगार झाला नसल्याने शिक्षक वर्ग नाराजी व्यक्त करत आहेत.चार महिन्यापासुन पगार न झाल्यामुळे या संचारबंदीच्या काळात जवळपास ८०  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यावर सद्या उपासमारीची वेळ आली आहे.
संस्थेच्या अंतर्गत वादामुळे अभिनव शेतकरी संस्थेत दोन गट पडले आहेत. परंतु, पगार पत्रकावर करण्यात येणाऱ्या सह्यांचे अधिकार मात्र अध्यापही मोहन पाटील यांच्याकडेच आहेत.पगार पत्रकावर फक्त प्राचार्य व मोहन पाटील यांच्याच सह्या चालतात. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या या चेकवर सह्या झालेल्या असताना देखील संस्थेचे कार्याध्यक्ष मोहन पाटील हे गेल्या चार महिन्यांपासून पगार पत्रकावर सह्या करण्यास चालढकल करत आहेत. या आधीही ३ महिन्यांचे पगार थांबले असतांना केवळ एक/दोन महिन्याचा पगार करत पुढे बघू असे सांगत मोहन पाटिल यानी विषय टाळला होता.कर्मचाऱ्यांनी प्राचार्यना गेल्या ४ महीने पगार न झाल्याप्रकरणी विचारले असता त्यांनी  पगाराच्या चेकवर सही केली आहे, मात्र मोहन पाटील प्रत्यक्ष हजेरीवर अडून बसले आहेत आणि पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष हजर करण्यास सांगितल्याची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेश असल्यामुळे शिक्षक व कर्मचारी बाहेर कुठेही जाऊ शकत नाही. प्राचार्य या संदर्भात आवश्यक ते हमीपत्र देखील देण्यास तयार आहेत.
 
मोहन पाटील यांच्या या अडेलतट्टू धोरणामुळे सर्व शिक्षक व कर्मचारी हवालदिल झाले आहेत.४ महिने पगार न झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फ़टका बसला असून  अशा परिस्थितीमध्ये  घर चालवणे शिक्षक वर्गाला कठीण झाले आहे.यासंदर्भात क्षिक्षक व कर्मचारी यांनी   प्राचार्य यांच्याशी संवाद साधून शिक्षक व कर्मचाऱ्याना पगार मिळवून द्यावा यासाठी पंतप्रधान कार्यालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड, शिक्षक आमदार कपिल पाटील, कुलगुरू आदींना पत्र लिहून मदतीची विनंती केली आहे. 


प्रतिक्रिया :


सध्याची परिस्थिती ही आपापसातील तंटे बाजूला ठेवून माणूसकी हेच मूल्य अनुसरण्याची आहे. मोहन पाटील यांनी त्वरित पगाराच्या धनादेशांवर सही करणे आवश्यक आहे. कार्यकारी मंडळातील त्यांच्या गटातील सदस्यांचे औपचारिक बहुमत जरी त्यांनी अजमावले तरी ते पगार देण्याचा कौल देईल असा मला विश्वास आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २०१९ आणि जानेवारी २०२० या महिन्यांची पगार पत्रके जेव्हा मोहन पाटलांकडे सुपुर्द केली त्या त्या वेळी कर्मचाऱ्यांची हजेरी, रजेचे अर्ज इ. तपशील त्यांना विदित केला होता. मोहन पाटील यांनी निरपराध कर्मचाऱ्यांवर राग काढू नये अशी जाहीर विनंती मी करीत आहे.



प्राचार्य केशव परांजपे (अभिनव विद्या मंदिर महाविद्यालय )