मीरा-भाईंदर करानो सावधान कोरोनाचा शहरात गेला दुसरा बळी
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेले आहे. मिरा-भाईंदर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
मीरा भाईंदर साठी दुःखद बातमी असून मीरा भाईंदर शहरात कोरोना विषाणूने दुसरा बळी घेतला आहे. मीरा-भाईंदर शहरात आज कोरोना विषाणू बाधित नवीन ७ रुग्ण आढळून आले आहेत. तर एका ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
मिरा-भाईंदर शहरात सध्या कोरोनाग्रस्त २९ रुग्ण होते त्यामध्ये दोन रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला तर दोन रुग्णांचा चाचण्या निगेटिव्ह आलेल्या असल्यामुळे शहरातील सध्या रुग्णांची संख्या ही 25 वर पोहोचलेली आहे.
मीरा भाईंदर मधील आज मृत्यू झालेला रुग्ण गंगासागर , नित्यानंद नगर मिरारोड पूर्व भागातील राहणारी ७५ वर्षीय वृद्ध महिला आहे तिच्या घरात यापूर्वी कोरोना ग्रस्त रुग्ण आढळलेला होता आणि त्याची लागण तिलाही झाली होती त्यामुळे तिला ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार चालू होते उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
मीरा-भाईंदर मध्ये आज कोरोनाग्रस्त नवीन सात रुग्ण आढळले आहेत.
गोडदेव भाईंदर पूर्व,मिरारोड मधील नित्यानंद नगर, नया नगर,विनय नगर हाटकेश या भागात एकूण सात नविन रुग्ण आज मिळून आले आहेत. त्यामुळे सर्व शहरवासीयांची चिंता वाढलेली आहे.
सध्याच्या संकटमय काळात प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे . आपले शहर,आपला परिसर,आपले घर, आणि स्वतःला जर सुरक्षित ठेवायचे असेल तर शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. शहरात मोकटपणे फिरणे बंद करा घरात बसून रहा तरच या महामारीचा मुकाबला करू शकतो.
आज मीरा-भाईंदर शहरात पोलिसांची कारवाईही कडक पहायला मिळाली शहरांमधल्या सगळ्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिकामटेकड्या फिरणाऱ्या लोकांवरती कारवाईचा बडगा उगारून लॉकडाउन व संचारबंदीचा नियम मोडणाऱ्या वर कारवाई करून निर्बंध आनलेले दिसले.