काटेकोर नियम बनवल्या नंतर मद्य विक्री आरोग्य मंत्र्यांनी केले ट्विट


काटेकोर नियम बनवल्या नंतर मद्य विक्री आरोग्य मंत्र्यांनी केले ट्विट


राज्यातील लाॅकडाऊनमूळे राज्यात मद्य विक्री बंद केल्याने तळीरामांचे हाल झाले आहे. मद्य पिण्याची सवय या तळीरामांना स्वस्त बसू देत नाही. त्यामूळे सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिवसातून एक तास तरी मद्य विक्री सुरू करण्याची मागणीच सोशल मीडियावर वारंवार या तळीरामांनी यापुर्वी केली आहे.


मात्र, कोरोनाचे थैमान जो पर्यंत राज्यावरून दुर होणार नाही. तोपर्यंत मद्य विक्री सुरू करता येणार नसल्याचे संकेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते. त्यामूळे मद्यप्रेंमीच्या आशा मावळल्या होत्या  पण, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर वरून केलेले ट्विट हे  मद्यप्रेंमीना दिलासा देणारे वाटत आहे. या संदर्भातील काही काटेकोर नियम बनऊनच मद्य विक्री संदर्भात अंतीम निर्णय घेता येईल असे ट्विट केल्यानंतर मद्यप्रेंमीनी ट्विटरवरच आनंद व्यक्त करत, आरोग्य मंत्र्यांचे धन्यवाद मानले आहे. तर काहींनी मद्यविक्री सुरू करण्यासाठी विरोध सुद्धा केला आहे. आता पुढे सरकार काय निर्णय घेते हे पहावे लागणार आहे.