मीरा-भाईंदर मध्ये कोरोनाने पसरले पाय, तीन जण कोरोना विषाणू बाधित , तर दोन जणांचे अवहाल येणे बाकीमीरा-भाईंदर मध्ये कोरोनाने पसरले पाय, तीन जण कोरोना विषाणू बाधित , तर दोन जणांचे अवहाल येणे बाकी
मीरा-भाईंदर मध्ये कोरोना विषाणूने बाधित करायला सुरुवात केली आहे मीरारोड पूर्व येथील नयानगर भागात एकाच कुटुंबातील ३ व्यक्तिंना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आलं आहे. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याच कुटुंबातील २ रुग्णांचा अहवाल अद्यापही आला नाही. मात्र त्यांना देखील लागण झाली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही अशी शंका वर्तवण्यात येत आहे.
देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या महाभयंकर संकटाने सुरवात केली आहे मुंबईत हा विषाणू गुणाकार रुपात वाढायला लागला आहे मीरा-भाईंदर शहरात पाय न पसरलेल्या कोरोना विषाणूने शहरात शिरकाव केला आहे. शहरातील एकाच कुटुंबातले ३ जण बाधित झालेले आहेत तर दोन जणांचे अहवाल यायचे बाकी आहेत यामुळे शहरात सर्वत्र चिंता पसरलेली आहे. पण काही नागरिक आणखीही गंभीर झालेले दिसत नाहीत बिनधास्त कायद्यांचे उल्लंघन करत वाहतुकीचे नियम तोडत फिरत आहेत.
देशातील वतावणार चिंतेचे असतांना मिरा-भाईंदर शहर या विळख्यात येऊ नये म्हणून मनपा प्रशासन काळजी घेत होते. पण या महामारीच्या रोगाने आपले पाय मिरारोड भागातील नया नगर परिसरातून पसरावयाला सुरवात केली आहे . एका ५५ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूने ने बाधित केल्याचे आढळून आलं होतं. हा रुग्ण गेल्या काही काळापासून कर्करोग आणि मधुमेह सारख्या आजाराने ग्रस्त होता. आठ दिवासापूर्वी त्याला न्युमोनिया झाल्यामुळे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे या रुग्णात आढळून येत असल्यामुळे, खाजगी रुग्णालयाकडून या व्यक्तीची कोविड-19 तपासणी केली गेली त्यात त्याला लागण झाल्याचा अहवालात आला. ही माहिती मिरा भाईंदर महानगरपालिकेला कळवण्यात आल्यानंतर. पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत या व्यक्तीला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात अधिक तपासणीसाठी नेले होते. त्याचबरोबर त्याच्याकुटुंबतील चार व्यक्तीनांही तपासणी करीता रुग्णालयात नेण्यात आले होते.
त्यापैकी त्या व्यक्तीच्या पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल कोरोना संक्रमित असल्याचा अहवाल समोर आले आहेत. तर अद्यापही त्या व्यक्तीचा कस्तुरबा रुग्णालयाकडून क्रॉस वेरिफाय रिपोर्ट आलेला नाही. मात्र खाजगी रुग्णालयाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर त्याचा एका मुलाचा अहवाल आला नाही. रूग्णाच्या मुलाला पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केलेलं आहे. एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाचे संक्रमण झाल्याने, त्याच कुटुंबातील दोन सदस्यांचे अहवाल येण्याचे बाकी आहेत . अनेक जणांना असे वाटते की एकाच कुटुंबातील व्यक्ती असल्याने आणि सातत्याने संपर्क असल्याने दोघांचे ही रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच हे कुटुंब ज्या नागरिकांच्या संपर्कात आले आहे त्या नागरिकांचा, व्यक्तीचां प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे. त्या परिसरीतील पाच हजार घर निर्जंतुकीकरण करण्यात आल्याच मिरा भाईंदरचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी माहिती सांगितली.
मिरा भाईंदरमध्ये मनपा क्षेत्रात आता पर्यंत ६५७ नागरीक हे परदेशातून आले असून, त्यापैकी ४०८ नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर २४९ नागरिकांना १४ दिवसांच्या तपासणीनंतर घरी सोडण्यात आले. तसंच ३७३ नागरिकांना घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. रोजच या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. सोमवारी पाठवण्यात आलेल्या १७ स्वॅब तपासण्यांमध्ये तीन रुग्ण हे पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती मीरा-भाईंदर मनपा आयुक्त यांच्या कडून देण्यात आली .