कमवा आणि शिका योजनेचे मिळणारे मानधन बंद न करता चालूच ठेवा अक्षय अनभुले यांची मागणी
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत महाविद्यालय बंदमुळे या योजनेतील विद्यार्थ्यांचे श्रमदान जरी बंद असले,तरी कमवा आणि शिका योजनेचे मिळणारे मानधन आपण बंद न करता चालूच ठेवावे जेणेकरून योजनेचा फायदा घेणाऱ्या ग्रामीण शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांना भेडसावणारी आर्थिक अडचण दूर करण्यास मदत होईल अशी मागणी केली जात आहे.
शिक्षण हे माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षण घेणे हा मूलभूत हक्क आहे. ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे या साठी सरकार प्रयत्न करत असते. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात असतो त्यातीलच एक म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे शहर, पुणे ग्रामीण,अहमदनगर आणि नाशिक जिल्हा मधील असंख्य महाविद्यालयातील हजारो गरीब विद्यार्थी कमवा व शिका या विद्यापीठातील योजनेचा फायदा घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.परंतु आता कोरोना या रोगाच्या साथीमुळे संपूर्ण देशात संचारबंदी व लॉकडाऊन केल्यामुळे विद्यापीठ व विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे सर्व महाविद्यालयये बरेच दिवस झाले बंद केले असून अजून किती दिवस बंद राहतील हे आत्ताच सांगता येणार नाही.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत महाविद्यालय बंदमुळे या योजनेतील विद्यार्थ्यांचे श्रमदान जरी बंद असले,तरी कमवा आणि शिका योजनेचे मिळणारे मानधन आपण बंद न करता चालूच ठेवावे जेणेकरून योजनेचा फायदा घेणाऱ्या ग्रामीण शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांना भेडसावणारी आर्थिक अडचण दूर करण्यास मदत होईल अशी मागणी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र
राज्य सरचिटणीसअक्षय अनभुले यांनी महाराष्ट् राज्याचे मुख्यमंत्री ,
उपमुख्यमंत्री,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,सिनेट सदस्य पुणे विद्यापीठ,संचालक,विद्यार्थी विकास मंडळ पुणे विद्यापीठ यांच्या कडे ईमेलद्वारे केली आहे. सरकार कडून समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे असेही त्यांनी सांगितले.
राज्यात ज्याप्रमाणे मनरेगा योजनेचे कामकाज बंद असूनही शासनाने त्यांना मानधन देण्याचे ठरवले आहे.त्याचधर्तीवर विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजनेचे मानधन गरीब विद्यार्थ्यांना वेळेवर द्यावे.
सरकारने व विद्यापीठाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन कमवा आणि शिका योजनेअंतर्गत मिळणारे मानधन महाविद्यालय बंदच्या काळातही विद्यार्थ्यांना मिळेल,अशा आशयाचे पत्रक लवकर काढावे व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. ही विनंती पाठवलेल्या पत्रात केली आहे.