अशी आहे नांदेड जिल्ह्यात होम क्वारंटाईन केलेल्यांची व बाहेरून आलेल्यांची संख्या

अशी आहे नांदेड जिल्ह्यात होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या


कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना सुरु आहेत़ याचाच भाग संशयितांना होम क्वारंटाईन केले जात आहे़. आता शहरात होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या ४ हजार २५ एवढी झाली आहे़ तर जिल्ह्यात ७ हजार ८४१ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़.


नांदेड जिल्ह्यात अशा ७ हजार ८४१ जणांच्या हातावर होम क्वारंटाईन चे शिक्के मारुन घरामध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे़ .या सर्वांना १४ दिवस घरात थांबणे बंधनकारक आहे़. विनाकारण घराबाहेर पडणा-यांना दंड ठोठावला जात आहे़. याबरोबरच शहराच्या विविध भागात बॅरीकेटस् लावून अकारण घराबाहेर पडणा-यांना चाप लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे़.


जिल्ह्यातील नगरपालिकानिहाय आकडेवारीचा विचार केला असता, सर्वाधिक ६३९ जण कंधार येथे होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत़ तर कुंडलवाडी १७२, किनवट १७५, देगलूर २३२, धर्माबाद १४२, बिलोली ८६, लोहा २८९, उमरी १४२, हदगाव २४८, भोकर ४७९, मुखेड २७२, मुदखेड १५७, अर्धापूर ३१०, माहूर ९६, हिमायतनगर १६५ तर नायगाव नगरपालिके अंतर्गत २१० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ नांदेड महानगरपालिकेअंतर्गत कालपर्यंत  ४ हजार २५ एवढी झाली आहे़ या सर्वांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत़


बाहेरगावाहून येणा-यांचा ओघ सुरुच


कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घराघरांत जावून सर्वेक्षण करण्यात येत आहे़ . जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार १२६ नागरिक हे बाहेर गावाहून जिल्ह्यात परतल्याचे स्पष्ट झाले आहे़. यामध्ये अर्धापूर २,१६८, भोकर १,९६०, बिलोली ४००५, देगलूर ६,२६५, धर्माबाद १३६१, हदगाव ३८५२, हिमायतनगर १७२२, कंधार ८८४३, किनवट २२९९, लोहा ४५५८, माहूर ३१२८, मुदखेड १५०३, मुखेड ८२५२, नायगाव ५६९४, नांदेड २२३०, उमरी १७१८ आणि इतर ठिकाणी ३९६६ जण बाहेर गावाहून परतले आहेत.


बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचा घरोघरी जावून सर्व्हे करण्यात येत आहे़ यात पुणे, मुंबईहून आलेल्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांचे घरामध्येच विलगीकरण करण्यास सांगण्यात आले आहे़ याबरोबरच कोरोनाची तापासह कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संशयितांना रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे़ जिल्ह्यात अशा १५ आयसोलेशन केसेस आहेत़ यामध्ये देगलूर येथे ३, मुखेड ४, माहूर ६ आणि नायगाव येथे दोघांना आयसोलेट करण्यात आले आहे़ नांदेडसह मुखेड येथे खास कोरोनासाठी रुग्णालय असणार आहे़.