कोरोनाला हरवण्यासाठी डोक्यावरील केशवपन करून पोलिसांनी केला एकीचा निर्धार

कोरोनाला हरवण्यासाठी डोक्यावरील केशवपन करून पोलिसांनी केला एकीचा निर्धार



मीरारोड पूर्व :  नेहमी बदनामीचा शिकार होणारा पोलिस वर्ग अनेकवेळा अभिनंदनास, अभिमानस पात्र कामगिरी बजावतो मात्र त्याकडे नागरिकांचे लक्ष जात नाही.पण कोरोनाच्या साथीपासून उत्तण वाशीयांना दूर ठेवण्यासाठी दिवसरात्र सेवा देणारा सागरी पोलिस ठाण्याचे शिपाई आपल्या जीवाची परिवाराची पर्वा न करता, नागरिकांच्या आरोग्याची, सुरक्षिततेचि काळजी घेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मीरा भाईंदर शहरात दररोज कुठेना कुठे कोरोनाचे रुग्ण आढळत असतांनाच.मात्र  शहरातील उत्तन परिसराला सुरक्षित ठेवण्यात आता पर्यंत तरी पोलिसांना यश मिळाले आहे. त्यामुळे या परिसरातील पोलिसांची कामगिरी ही अभिनंदनास पात्र असलेली कामगिरी आहे.


मुबंई लगत असलेला हा उत्तण चा परिसर हा पर्यटकानीं गजबजलेला परिसर असायचा तर एकीकडे कोरोनाच्या साथीने जगाला वेठीस धरले आहे.अशी परिस्थितीत महाराष्ट्र मध्ये देशातील सर्वधिक कोरोनाचे रुग्ण मिळून येत आहेत तर मुंबई शहरात सर्वधिक कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा आपत्कालीन परस्थितीमध्ये मुबंई लगत असलेला हा उत्तण चा परिसर सुरक्षित ठेवण्यात पोलिस प्रशासनांनी अहम भूमिका निभावली आहे. लॉकडाउन चे पुरेपूर पालन करत फिजिकल डिस्टगंसिंग ठेवत उत्तण परिसराला कोरोनाच्या साथी पासून दूर ठेवण्याचे काम पोलिस करत आहेत. 


दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या लॉकडाउन च्या काळात या परिसरातील गुन्हेगारी स्वरूपांच्या कृत्याचे प्रमाण अगदी नगण्य झाले आहे. हे एक वेगळेच सुख उत्तण परिसरातील अनुभवले आहे. उत्तण विभागात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. गुन्हेगारी कमी झाल्याने पोलिसांनी निर्धार केला आहे की या पुढे ही हीच परिस्थिती तशीच ठेवायची या उद्देशाने पोलिसांनी संकल्प करत सगळ्यांनी एकीची एकजुट दाखवत आपले केशवपन करून नागरिकांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी संकल्प केला आहे. त्यामुळे बुधवारी उत्तन सागरी पोलिस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यानी एकत्र येत आपल्या डोक्यावरिल केस काढून लोकांना  एक प्रकारचा एकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.


             आजवर मीरा भाईंदर मध्ये कोरोना बाधितांची संख्या ४९ झाली आहे.  मीरा भाईंदर शहरात एकूण ६ पोलिस स्टेशन असून नवघर,मीरारोड, काशीमीरा,नया नगर,भाईंदर या ५ ही पोलिस स्टेशन च्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत मात्र ६ पैकी फक्त एका उत्तन सागरी पोलिस स्टेशन च्या हद्दीत आजवर एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नसून त्या परिसराची लोकसंख्या जवळपास ४०००० इतकी आहे.उत्तन पोलिस लॉकडाऊन सुरु झाल्या पासून घरी जात नसून दिवस रात्र आपले कर्तव्य निभावत आहेत.इतकेच नाही तर लोकांनी अश्या कठिन काळात एकमेकांना मदत करावी व आलेल्या संकटाला समोर जावे या करता त्यानी आपल्या डोक्यावरिल केस काढून लोकांना एकिचा संदेश दिला आहे.उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले की आमच्या कर्मचाऱ्यानी लोकां मध्ये एकी निर्माण व्हावी याकरीता डोक्यावरचे केस काढून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे व लोकांचा देखील याला चांगला प्रतिसाद भेटत आहे. असेच चांगले कार्य पोलिसांच्या हातून घडत राहावे अशी अपेक्षा उत्तणकरांनी व्यक्त केली आहे.