मिरा भाईंदरमध्ये कोरोना ग्रस्तांचा आकडा पोहोचला १२९,आज इथे सापडले ९ रुग्ण

मिरा भाईंदरमध्ये कोरोना ग्रस्तांचा आकडा पोहोचला १२९,आज इथे सापडले ९ रुग्ण


मिरा भाईंदरमध्ये आज ९ कोरोनाग्रस्त नवीन रुग्णांची भर पडली आहे आता शहरातील रुग्णांची आकडेवारी १२९ पोहचली आहे.  त्यापैकी २४ रुग्ण हे उपचार घेऊन बरे झाले आहेत तर दोघांना आपला जीव  गमवावा लागला आहे. शहरात सध्या कोरोना बाधित रुग्ण १०३ आहेत तर ९९ जनांच्या चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत ५३५ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.


आजच्या नवीन कोरोनाबधित रुग्णामध्ये मिरारोड लोढा रोड येथील ५ रुग्ण आहेत, ८ वर्षीय मुलगा, २५ वर्ष पुरुष, २७ वर्ष पुरुष, ३२ वर्षीय महिला व ३७ वर्षीय पुरुष हे रुग्ण आहेत. तर सुंदर नगर येथील २९ वर्षीय पुरुष व काशीमिरा येथील ३२ वर्षीय महिला आहे. तर भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील १८ वर्षीय मुलगा आहे व मुर्धा रेवागर येथील ५० वर्षीय पुरुष आहे.


 शहरात पडताळणी केलेल्या एकुण १४३६ जणांमधील १० जण नव्याने आढळुन आलेले आहेत. यातील ३८३ जणांनी १४ दिवसांचा अलगीकरणाचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. १०५३  जणांना पालिकेच्या देखरेखीखाली अलगीकरण केले असुन त्यापैकी ७२१ जणांना घरातच तर ५० जण महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात पालिकेच्या देखरेखी खाली आहेत, तर ४५ जणांना आयसोलेशन वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले आहे.