मीरा-भाईंदर मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लागणार आता दुचाकी चार चाकीला ब्रेक


मीरा-भाईंदर मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लागणार आता दुचाकी चार चाकीला ब्रेक


 


जगात सुरू असलेला कोव्हिडं१९ चा प्रदुर्भाव पाहता या व्हायरसने जगाला वेठीस धरले आहे. भारतात या विषाणूचा वाढलेला धोका लक्षात घेता सरकारने देशात संचारबंदी आणि लॉकडाऊन घोषित केला या सरकारच्या आदेशाला काही ठिकाणी वेगवेगळ बहाणे सांगून हरताळ फासण्याचे काम काही मंडळीकडून जाणीवपूर्वक होताना दिसू लागल्यामुळे सरकारच्या वतीने वेगवेगळे नियोजन केले जात आहे.


सरकारच्यावतीने वारंवार विनंती वजा सूचना करून नागरिकांना पसरत चाललेल्या covid-19  संदर्भात गांभीर्य घेतलेले दिसत नसल्यामुळे व मीरा-भाईंदर शहरामध्ये  कोरोना विषाणूची  लागण झालेल्या रुग्णांची संख्या  दिवसेंदिवस वाढत आहे.  अशा गंभीर परिस्थितीत  नागरिकांनी  जागरूक  राहाणे  गरजेचे असतानाही  शहरातील काही  मंडळी  सरकारच्या उपाय योजनेचा  गैरफायदा घेऊन  रस्त्यावर  बिनाकामाचे  फिरत होते. त्यामुळे नुकतेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून देण्यात आलेले अत्यावश्यक सेवेसाठी दिलेले ओळखपत्र रद्द केले गेले आहे. तरीही अनावश्यक पणे रस्त्यावर फिरणे सुरू आहे वेगवेगळी कारणे पुढे करून फिरण्यासाठीचे बहाने शोधणाऱ्यांची संख्या शहरात वाढत असल्यामुळे हे निर्बंध लागू केल्याचे चित्र आहे.
भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५,मोटार वाहन अधिनियम १९८८,सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय,मुंबई यांच्याकडचे आदेश आणि पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्याकडील प्रस्ताव पाहता ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पोलिस प्रशासनाला नवीन आदेश काढलेले आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली या अन्य ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुचाकी,तीन चाकी, चार चाकी, वाहने,टॅक्सी यांचा प्रवासी वापर करण्यास सक्त मनाई (प्रतिबंध) केला आहे. या आदेशामधून अत्यावश्यक सेवा देणारे वाहने,त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्ती कामानिमित्त घेऊन जात असलेली वाहने व प्रसार माध्यमांचा वाहनांना वगळण्यात आले आहे.


Covid-19 प्रदुर्भावाला आळा घालण्यासाठी उपाय योजना म्हणून मीरा-भाईंदर शहरातील कोणतेही खाजगी वाहने अनावश्यक कामासाठी घेऊन फिरणे किंवा प्रवास करणे याला आता शहरात ब्रेक लागेल, यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी एका परिपत्रकाद्वारे हे निबंध घालण्याचे आदेश शहरातील पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
जर या दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात आली तर संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश त्यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहेत.