पोलिस अधिकाऱ्यासह १२ पोलिस कर्मचारी केले क्वारंटाईन पोलिस मदत पत्र मिरारोड :-

 


पोलिस अधिकाऱ्यासह १२ पोलिस कर्मचारी केले क्वारंटाईन


पोलिस मदत पत्र मिरारोड :-
मुंबईतील कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिस उपायुक्त पदाच्या लेवल ला काम करणाऱ्या एका बड्या अधिकाऱ्याला कोरोना विषाणू ची लागण झाल्याची लक्षणे दिसून आली आहेत. त्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. हे जरी असले तरीही पोलिस प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


कोरोना साथीचा सामना करण्यासाठी देशात संचारबंदी सुरू आहे. २१ दिवसाचा लॉकडाउन सुरू आहे. देशात डॉक्टर, पोलिस, सह वेगवेगळ्या आस्थापना सेवा देण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. जीवावर उदार होऊन ही सेवा दिली जात आहे. याचे गांभिर्य सर्वसामान्य माणूस म्हणून नागरिकांनी ओळखले पाहिजे पण तसे होतांना दिसत नाही. सर्वांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर सदैव दिसणारा खाकीवर्दीतला माणूस या महामारीची सामना करण्यासाठी लढत आहे.  त्याच वर्दीतल्या माणसाला ही कोरोनाच्या विळख्यात जावे लागल्याने पोलीस  दलात एकच खळबळ उडाली आहे. तर अपुरी सुरक्षा यंत्रणा असल्यामुळे पोलिस खात्याच्या सुरक्षिततेच प्रश्न निर्माण होत आहे.


देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र या कोरोनाच्या साखळीत अडकला आहे . मुंबईसह ,उपनगरे ,ठाणे, पालघर, जिल्ह्यासह शहरातील चाळी, झोपडपट्ट्यामध्ये शिरकाव करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावध होऊन ही साखळी तोडण्यासाठी सतर्क झाले पाहिजे सरकारच्या सूचनेचे पालन करणे गरजेचे आहे.तरच ही कोरोनाची पसरत चाललेली साखळी तोडू शकतो.


लक्षणे दिसत असलेल्या अधिकाऱ्याचे स्वॅब चाचणीकरिता पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे. या रिपोर्टची प्रतीक्षा सर्वांना आहे. खबरदारी म्हणून या अधिकाऱ्याच्या कार्यालयातील १२ पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे.


कोरोनाच्या संक्रमनाच्या विळख्यात सापडून अनेकांचे मृत्यू होत आहेत केंद्र सरकार, राज्यसरकार वेळोवेळी आकडे जाहीर करत आहेत.प्रत्येक तासाचे अपडेट दिले जात आहे.हीच वेळ आहे सावध राहाण्याची प्रत्येकांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासात १२ जणांना मृत्यूने घेरले आहे तर नवीन रुग्ण ३३६ झाले तर आता पर्यंत ५६ जनांचा मृत्यू झाला आहे.