मीरा-भाईंदर शहरात ३ वर्षाच्या चिमुकलीला कोरोनाची लागण

 


मीरा-भाईंदर शहरात ३ वर्षाच्या चिमुकलीला कोरोनाची लागण


●शहरातला लॉकडाऊन अधिक कडक


●सायंकाळी पाच ते नऊ याकाळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने असणार बंद


●या लोकडाउनमधून औषधांच्या दुकानानां वगळले


●एकाच दिवशी सात रुग्ण वाढले रुग्णांचा आकडा झाला पंधरा


मीरारोड पूर्व : मिरा भाईंदर कोरोनाच्या रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. भाईंदर पश्चिम येथील तीन वर्षाच्या चिमुकलीला तिच्या आईसह व घरातल्या इतर तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी पर्यंत असलेला आठ रुग्णांचा आकडा आता थेट पंधरा वर पोहोचला  असंल्याची माहिती पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज दिली.


कोरोनाचा झपाटयाने वाढत असलेला कहर पाहता, मीरा-भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मिरा-भाईंदर शहरात असलेला लॉकडाऊन अधिक सक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. जीवनावश्यक वस्तुच्या दुकानांना आज  संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत टाळे लागले जाणार आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजे पर्यंत ते आवश्यक सेवेचे दुकाने सुरू राहतील या निर्णयातून औषधांच्या दुकानांना मात्र वगळण्यात आले आहेत


काल शनिवार पर्यंत ही संख्या ८ होती आज दिवसभरात यामध्ये ७ रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ वर आली आहे. हा संसर्ग शहरात आता हातपाय पसरू लागल्या मुळेच शहरातला लॉक डाऊन ही अधिक कडक केला जात आहे. औषधाची दुकाने वगळता सर्व दुकानं उद्यापासून सायंकाळी पाच ते नऊ बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी घेतला आहे
        मिरा भाईंदर  शहरात कोरोनाची लागणं झालेले एकाच दिवसात रविवारी आणखी ७ रुग्ण आढळून आले  आहे .शहरात करोना बधितांची संख्या १५ झाली आहे अशी  माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे. भाईंदर पश्चिम नारायणनगरमधील एकाच कुटुंबातल्या पाच व्यक्तींना  कोरोनाने विळखा घातला आहे ६० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्या पती,मुलगा,सून, ३ वर्षाच्या चिमुकलीला, हे देखील कोरोनाची बाधा झालीआहे.