कोरोना बाधित रुग्णांचा एकीकडे आकडा वाढतोय तर कोरोनावर मात करणाराचें प्रमाण ही वाढत आहे कल्याण-डोंबिवलीत सहा महिन्यांच्या बाळाने कोरोनावर मात केली आहे. ही त्यातच आता आनंदाची बातमी आली आहे.
कल्याणमधील सहा महिन्यांचे एक बाळ कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे शहरात चिंता होती अनेकांचे काळजात चरर केले होते पण डॉक्टरांनी केलेल्या उपचाराला प्रतिसाद देऊन बाळाने कोरोनावर विजय मिळवला त्यामुळे परिसरात आणि रुग्णालयात ही आनंद पसरला आहे.
हे सहा महिन्यांचे बाळ बरे होऊन आपल्या घरी आले आहे. या बाळाचे मनसे नगरसेविका कस्तुरी देसाई यांच्या सह सोसायटी आणि आजूबाजूच्या सोसायटीच्या तर्फे जंगी स्वागत केले. टाळ्या, थाळ्या आणि शिट्या वाजवत स्वागत केले. सगळयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता बाळाची आई एकदम खुश होती. तिने बाळाच्या हात वरती करत सर्वाचे आभार मानले. यावेळी नागरिकांनी आणि मनसे नगरसेविका यांनी पोलीस, डॉक्टर आणि रुग्णवाहिका चालकाचे हि आभार मानले.