आजपर्यंत मिरा भाईंदरमध्ये कोरोना संक्रमित रुग्ण झाले १४२
मिरा भाईंदरमध्ये आज १३ कोरोना संक्रमण झालेले नवीन रुग्ण मिळून आले आहेत. तर नवीन केस मध्ये बी.पी. रोड साई बाबा हॉस्पिटल भाईंदर पूर्व, व मणी पॅलेस मॅकडोनल्ड समोर येथून २ रुग्ण मिळाले आहेत. आता शहरातील रुग्णांची आकडेवारी १४२ पोहचली आहे. त्यापैकी २६ रुग्ण हे उपचार घेऊन बरे झाले आहेत तर दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरात सध्या कोरोना बाधित रुग्ण ११४ आहेत तर २३ जनांच्या चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत ६३१ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.आता आतापर्यंत एकूण १४९१ नागरिकांना अडेन्टिफाय करण्यात आले होते त्या पैकी ७९६ जणांचे चाचणी करण्यात अली आहे. त्या मध्ये ६३१ जनांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आजच्या नवीन कोरोनाबधित रुग्णामध्ये भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील ४९ वर्षा ची महिला, मिरारोड येथील शांतीनगर सेक्टर-३ मधील ३ रुग्ण आहेत ज्या मध्ये ४४ वर्षा ची महिला,१५ व,१३ वर्षा च्या दोन मुली आहेत. खारींगव भाईंदर पूर्व येथील तीन रुग्ण आहेत ज्या मध्ये ५४ वर्षीय महिला ४१ वर्षीय पुरुष व ५ वर्षा चा मुलगा आहे, काशीमीरा येथील राज इस्टेट समोरील इमारती मधील ३४ वर्षीय पुरुष,१३वर्षांची मुलगी,३ वर्षा चा मुलगा आणि २२ वर्षाचा युवक असे चार रुग्ण आहेत , बी.पी. रोड साई बाबा हॉस्पिटल भाईंदर पूर्व येथून २० वर्षा चा युवक आहे , व मणी पॅलेस मॅकडोनल्ड समोर मीरारोड पूर्व येथील ३७ वर्षा चा पुरुष आहे.असे आज ऐकून तेरा नवीन रुग्ण मिळून आले आहेत. शहरात पडताळणी केलेल्या एकुण १४९१ जणांमधील १३ जण नव्याने आढळुन आलेले आहेत. ११०८ जणांना पालिकेच्या देखरेखीखाली अलगीकरण केले आहे.