धक्कादायक कोरोनाची लागण असतांनाही चक्क ६ दिवसांनी केले उपचारासाठी रुग्णालयात दाखल

धक्कादायक कोरोनाची लागण असतांनाही चक्क ६ दिवसांनी केले उपचारासाठी रुग्णालयात दाखल


कोरोना विषाणूचा फटका संपूर्ण जगाला बसलेला आहे. त्यातच भारतामध्येही या विषाणूने मोठ्या प्रमाणात थैमान सुरू केले आहे महाराष्ट्रासह मुंबईमध्ये कल्लोळ माजवलेल्या कोरोना विषाणूची  शृंखला तोडण्यासाठी सरकार च्या वतीने पावले उचलण्याची प्रक्रिया सुरू केलेली असतानाही मीरा-भाईंदर मनपाचा गोंधळाचा कारभार मात्र समोर येताना दिसत आहे. चक्क ६ दिवसानंतर कोरोना विषाणूची लागण झालेल्या मुलीला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.



मिरा-भाईंदर शहरात मिरा रोड मधून कोरोना चा पहिला रुग्ण सापडला त्या मिरारोड मध्ये घडलेल्या प्रकाराने महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचे खरे रूप समोर आले आहे. मीरा रोडच्या शांती गार्डन सेक्टर -३ मध्ये राहणाऱ्या एका ६ वर्षीय मुलीला भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्या जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाची covid-19 चाचणी घेण्यात येत आहे. त्याप्रमाणे त्या मुलीच्या घशातील स्त्रावाचे नमुने १२ एप्रिल रोजी घेण्यात आले, १४ एप्रिल रोजी हे नमुने लॅब मध्ये पाठवलेले गेले, त्या नमुन्याचा रिपोर्ट १७ एप्रिल रोजी आला, त्या मुलीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले, असतानाही महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक चक्क ६ दिवसांनी म्हणजे २२ तारखेच्या दुपारी त्या मुलीच्या घरी जाऊन मुलीला कोरोना उपचारासाठी भाईंदर चा पंडित भीमसेन जोशी  येथे सुरू केलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचबरोबर तिच्या पालकांनाही घेऊन जाण्यात आले. आणि तिचा बुधवारी देण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये कोरोना विषाणू ची लागण झाले असल्याचा रिपोर्ट यादीत समाविष्ट करण्यात आले.
कोरोनाची लागण झालेली असतानाही चक्क उपचारासाठी दाखल करण्यास मनपाने ६ दिवस वेळ लावल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महापालिकेकडून इतक्या उशिरा या मुलीला रुग्णालयात का दाखल केले गेले. असे प्रश्न स्थानिक रहिवाशी हे विचारात आहेत. यासंदर्भात महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी पडवळ यांना फोन करून या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला गेला पण त्यांच्याकडून फोन उचलला गेला  नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया याठिकाणी देता आली नाही.


या प्रकारात नेमका दोष कोणाला द्यावा हा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे. तोंडातील स्त्रावाचे नमुने घेतल्यानंतर दोन दिवस लॅबमध्ये पाठवण्यासाठी अवधी लागतो. तर त्या नमुन्याचे रिपोर्ट आणण्यासाठी दोन दिवसाचा वेळ घेतल्या जातो खरंतर चोवीस तासाच्या आत पोट यायला हवा होता पण तसे न होता रिपोर्ट येण्यासाठी दोन दिवस गेले त्यामुळे याच नेमके दोषी कोण हा प्रश्न समोर येत आहे.



प्रतिक्रिया



या घडलेल्या धक्कादायक प्रकारा संदर्भात महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे  यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता त्या म्हणाल्या की या घटने संदर्भात मी मनपा उपायुक्त डॉक्टर संभाजी पानपट्टे यांना सूचना केल्या आहेत सोसायटीमधील सदस्यांनी फोनद्वारे माझ्याकडे तक्रार केली होती. तशा सूचनाही मी पण पाणपट्टे यांना दिल्या आहेत. आणि सदर सोसायटी सिल करण्यास संदर्भामध्ये ही सांगितले आहे यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया महापौर हसनाळे यांनी पोलिस मदत पत्र सी बोलताना दिली.


ज्योत्स्ना हसनाळे  


महापौर


मिरा भाईंदर महानगरपालिका