महाराष्ट्रात वाढतोय कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे,. आज २२१ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १९८२ वर पोहोचली आहे. यापैकी २१७ जण उपचारानंतर ठीक झाले आहेत. त्याना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आज राज्यात २२ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
याशिवाय देशात आज ९०० चा आकडा पार केला आहे नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ८४४७ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत देशात २७३ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.