मिरा-भाईंदर शहरात आतापर्यंत कुठे कुठे सापडले कोरोना रुग्ण वाचा सविस्तर
कोरोनाच्या धास्तीने हवालदिल झालेला प्रत्येक नागरिक लॉकडाउन चे पालन करत घरातच राहून या महामारीची शृंखला तोडण्यासाठी सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही काही बेजबाबदार नागरिकांच्या वागण्यामुळे शहरात कोरोनाचा फैलाव जोर पकडताना दिसत आहे. दररोज मिळत चाललेले नवीन रुग्ण मनात धडकी भरवणारे आहे. या संकटाला संपवायचे असेल तर सगळ्यांना जागरूक राहून ही साखळी तोडावी लागेल तरच शक्य आहे.
मीरा-भाईंदर शहरात पहिला रुग्णाची सुरवात ४ एप्रिल पासून सुरू झाली आज २६ एप्रिल आहे आज शहरातील रुगणांची संख्या १२९ वर पोहचली आहे त्यामध्ये एकूण ऍक्टिव्ह रुग्ण १०३ आहेत तर उपचारांती २४ जण करोना मुक्त झालेले आहेत व दोन (२) जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आता पर्यंत ची कोरोना विषाणूची लागण झालेली क्षेत्रे खालील प्रमाणे आहेत.
मिरा रोड- एकूण = ८७
नया नगर - १८, मेडतीया नगर - २, नित्यानंद नगर - २, आरएनए ब्रॉडवे - ३, बेवर्ली पार्क -२, विनय नगर - ३, पूजा नगर - ५, पुनम क्लस्टर -१, सिल्वर पार्क -१, पुनम सागर -६, मंगल नगर -४, इंदिरा गांधी हॉस्पिटल परिसर -१, कशी गाव -४, साई बाबा नगर -१, शांती पार्क -३, बालाजी हॉटेल -२, एमटीएन एल -३, श्रुती गार्डन -१, गौरव संकल्प -१, शांती निकेतन -१, सिल्वर प्लाझा -१, प्लेजन्ट पार्क -२, एन एच स्कूल -१, जॉगर्स पार्क -१, लोढा नगर -१, भारती पार्क -१, पटेल कॉम्प्लेक्स -१, शांती पार्क -१, शांती नगर -१, कशी मिरा -२, शांती गार्डन -१, लक्ष्मी पार्क -१, वेस्टन पार्क -१, पूनम गार्डन -१, शीतल नगर -१, लोढा कॉम्प्लेक्स -५, सुंदर नगर -१,
भाईंदर पूर्व- २१
एस वी रोड नवघर - १, गोडदेव - ९, बी पी रोड -१, एम आई मस्जिद - १, नवघर रोड -१, केबिन रोड -१, न्यू गोल्डन नेस्ट -१, इंद्र लोक फेज (६)-१, शिर्डी नगर -१, भाईंदर फाटक -२, खारी गावं -१, जेसल पार्क -१,
भाईंदर पश्विम - =२१
नारायण नगर - ५, शिवसेना गल्ली - १२, उत्तन -१, ६० फिट रोड -१, आंबेडकर नगर -१, मुर्धा -१