आजार पणाने झाला मृत्यू पण,कोरोनाने हादरलेले स्थनिक यांनी केला प्रेताला विरोध

आजार पणाने झाला मृत्यू पण,कोरोनाने हादरलेले स्थनिक यांनी केला प्रेताला विरोध


पालघर जिल्ह्यातील मनोर नांदगाव पालवी पाडा येथे घडलेल्या घटनेने या परिसरातले कोरोनाने माणसातले माणूसपण आणि माणुसकी हिरावून घेतली काय असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडत आहे गेल्या कित्येक दिवसापासून भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात रक्ताच्या आजाराने पीडित असलेल्या गणेशा गणेश पारधी यांचे रुग्णालयात निधन झाले,
त्यांचे पार्थिव अंबूलस ने त्यांचा नांदगाव येथे आणले असता स्थानिक नागरिकांचा मनात असलेला कोरोना संदर्भातला गैरसमज आणि वाढलेली कोरोनाची धास्ती यामुळे या महिलेचा मृत्यू कोरोनाच्यामुळे झाला असावा अशी पसरलेली लोकभावना झाली होती त्यामुळे सदर पाड्यातील लोकांनी या महिलेच्या शेवटच्या अंत्यविधीला स्थानिकांनी विरोध केला त्यांच्या परिवाराच्या दुःखात त्यांचे नातेवाईक सहभागी झालेले बघायला मिळाले नाही पाड्यातील स्थानिकांनी आणि नातेवाईकांनी विरोध केल्यामुळे  मृतकाच्या पती भाऊ आई वडील यांनी प्रेत जाळण्यासाठी लाकडी जमवाजमव केली नांदगाव ग्रामपंचायतचे सरपंच पवन चौरा सचिन डावरे शैलेश पवार व रिक्षाचालक पिंट्या त्यांनी पुढाकार घेऊन या साठी लागणाऱ्या सामानाची जमवाजमव केली सध्या सगळीकडे लॉकडाउन च्या धर्तीवर सगळ्या सामानाची दुकाने बंद असल्यामुळे अंत्यविधी साठी लागणारे संपूर्ण सामान मिळाले नाही. स्थानिक पाड्यातील लोकांनी केलेल्या विरोध आणि नातेवाईकांनी फिरवलेली पाठ यामुळे या महिलेच्या अंत्यविधीला काही मोजकेच लोक हजर राहिले यामुळे कोरोनाच्या साथीने माणसातले माणूसपण ही हरवले आहे काय? नात्यातलाही दुरावा निर्माण खरंच चालली आहे की काय असा प्रश्न पडायला लागला आहे. त्यामुळे असेच म्हणावे लागेल कोरोनाची वाढलेली भीती , तुटत चालली  जन्मोजन्मी जुळलेली नाती.