मीरा-भाईंदर शहरात आज वाढले ७ नवीन रुग्ण एकूण संख्या झाली १५२
आजपर्यंत मिरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १५२ झाली आहे. मिरा भाईंदरमध्ये आज ७ कोरोना संक्रमण झालेले नवीन रुग्ण मिळून आले आहेत. तर नवीन रुग्णां मध्ये नवघर गावं तलावा जवळ भाईंदर पूर्व, नर्सिंग होम लेन नयानगर मिरारोड पूर्व,गार्डन सिटी समोर नेक्स्ट टू पेरल डिमांड मिरारोड पूर्व येथून ३ रुग्ण मिळाले आहेत. आता शहरातील रुग्णांची आकडेवारी १५२ पोहचली आहे. त्यापैकी ४४ रुग्ण हे उपचार घेऊन बरे झाले आहेत तर दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
शहरात सध्या कोरोना बाधित रुग्ण १०६ आहेत तर १४ जनांच्या चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत ६७२ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.आता आतापर्यंत एकूण १५१९ नागरिकांना अडेन्टिफाय करण्यात आले होते त्या पैकी ८३८ जणांचे चाचणी करण्यात अली आहे. त्या मध्ये ६७२ जनांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आजच्या नवीन कोरोनाबधित रुग्णामध्ये भाईंदर पूर्वेच्या नवघर गावातील तलावा जवळ राहत असलेल्या ३७ वर्षीय पुरुष आढळुन आला आहे. भाईंदर पश्चिम मधील शिवसेना गल्ली मध्ये तीन रुग्ण मिळून आले आहेत ज्या मध्ये ३४ वर्षा चा पुरुष २९ वर्षा चा पुरुष, व ४ वर्षांची मुलगी आहे. मिरारोड पूर्व येथील दर्शन कॉम्प्लेक्स सुंदरनगर मध्ये २६ वर्षा ची युवती , नर्सिंग होम लेन नयानगर मधून ४० वर्षीय पुरुष,गार्डन सिटी समोर नेक्स्ट टू पेरल डिमांड येथील ३५ वर्षीय पुरुष आहे.असे आज एकून ७ नवीन रुग्ण मिळून आले आहेत. शहरात पडताळणी केलेल्याची संख्या एकुण १५१९ आहे.
कोरोनाची धास्तीने हवालदिल झालेला प्रत्येक नागरिक लॉकडाउन चे पालन करत घरातच राहून या महामारीची शृंखला तोडण्यासाठी सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही काही बेजबाबदार नागरिकांच्या वागण्यामुळे शहरात कोरोनाचा फैलाव जोर पकडताना दिसत आहे. दररोज मिळत चाललेले नवीन रुग्ण मनात धडकी भरवणारे आहे. या संकटाला संपवायचे असेल तर सगळ्यांना जागरूक राहून ही साखळी तोडावी लागेल तरच शक्य आहे.