पालघर जिल्ह्यात साधूंची हत्या झालेल्या गावात सत्ताही बीजेपीची सरपंचही बीजेपी चा सामानाच्या संपादकीय मधून घेतला विरोधकांचा समाचार
पालघर जिल्ह्यातील गैरसमज मधून घडलेल्या घटनेचे बीजेपी राजकारण करत आहे. देशावर ओढवलेल्या संकटकाळात असे राजकारण करणे चुकीचे आहे अशा भावना सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. मात्र सत्ताधाऱ्यांचे विरोधक असलेले भाजपाकांकडून यात राजकारण करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न अशी भावना जनमानसात निर्माण होत आहे.
कोरोनाचे संक्रमण वाढलेले आहे त्यासाठी पोलिस बंदोबस्त लागलेला असताना दुर्दैवाने त्याच काळात दोन महाराजांची हत्या होणे हे दुर्दैवी नक्कीच आहे पण या बाबीचे विरोधकांनी राजकारण करणे हे सुद्धा तेवढेच दुर्दैवी म्हणावे लागेल.
या घटनेसंदर्भात मीडिया व सोशल मीडियाच्या माध्यमातून एका विशिष्ट विचारांचे तसेच संस्था आणि संघटनेशी संबंधित लोक बोलू आणि लिहू लागले आहेत. हेसुद्धा देशासाठी घातक ठरणारे आहे अशी शंका सामानाने उत्पन्न केली आहे. काहींचा हिंदुत्ववाद या निमित्ताने उफाळून आला आहे, पण याबाबतीत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून समाचार घेतला गेला आहे.
समाज माध्यम वर टीका टिप्पणी करणाऱ्यानी लक्षात घेतले पाहिजे की, ज्या गडचिंचले गावात ही दुर्घटना घडली ते गाव व ग्रामपंचायत गेली दहा वर्षे पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आहे. सरपंच भाजपचाच आहे. म्हणजे मारहाण करणार्यायांचा रंग कोणता, हे सांगायला नको अशी टीका शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे.
पण आम्हाला या प्रकरणास राजकीय रंग देण्याची इच्छा नाही. साधू मारले गेले हे त्यांचे दुःख नसून साधू मारल्यावर पेटवापेटवीचे प्रयत्न अपयशी ठरले या दुःखाने ते तळमळत आहेत. अशी भावना व्यक्त केली आहे.
त्याच बरोबर आपल्या संपादकीय मध्ये मागील बीजेपी काळात घडलेल्या घटनांचा आढावा देखील घेतला आहे
उत्तर प्रदेशसारख्या राज्यात हिंदू महासभा अध्यक्षाची अलीकडेच गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या अंगावरही भगवेच कपडे होते असं शिवसेनेने म्हटलं आहे.
काहींनी हिंदू साधूंची हत्या होते यावर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. या चिंतेमागचे खरे कारण वेगळेच आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही समाज माध्यमांवर या घटनेवरून अश्रूंचा पूर वाहिला आहे. पण याआधी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात धुळय़ात पाच आणि चंद्रपुरात एका हिंदू गोसाव्याची जमावाने अशीच निर्घृण हत्या केली होती. तेव्हा हा हिंदुहृदयसम्राटांचा महाराष्ट्र नव्हता काय? अशी विचारणा सामना मधून शिवसेनेने केली आहे.
गोमांस भक्षणप्रकरणी दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेशात सतत मॉब लिंचिंग झाले, पण मरणारे मुसलमान होते म्हणून बेगडी हिंदुत्ववादी उन्मादाने नाचत होते. मग आपल्यात व ओसामा बिन लादेन, मसूद अझहर वगैरे निर्घृण लोकांमध्ये फरक काय? असा प्रश्न विचारला आहे. मॉब लिंचिंग एक विकृती आहे व या विकृतीचे समर्थन कोणालाही करता येणार नाही असं शिवसेनेने म्हटलं आहे.
आजही महाराष्ट्राचा ग्रामीण भाग अज्ञान, अंधश्रद्धा आणि अफवांच्या जाळय़ात अडकला आहे. त्यातूनच चंद्रपूर, धुळे आणि डहाणू-पालघरसारख्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करू नये असे असं आवाहन सामानाच्या संपादकीय मधून केले आहे.