मॉर्निंग वॉक च्या नावाखाली फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा धडाका
काशीमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहाटे पाच वाजल्या पासून ते आठ वाजेपर्यंत मॉर्निंग वॉकच्या नावाखाली फिरणाऱ्या नागरिकावरती पोलिस विभागाने कारवाईचे सत्र सुरू केले आहे काल आणि आज मिळून जवळपास आता पर्यंत अनेक जणांवर कारवाई करण्यात आली असून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भाईंदर शहरात कोरोना रोगाचा कहर वाढत असताना नागरिकांना शासनाकडून सतत जागृतीचे, सतर्क राहण्याचे आदेश देण्यात येत असतानाही काशिमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक मात्र आदेश धुडकवात रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत.
जगाला वेठिस धरलेल्या कोरोना महामारीच्या साथीने सगळी कडे उच्छाद मांडला आहे. मीरा-भाईंदर मनपाच्या हद्दीत दररोज वाढत चाललेली कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या पाहता शहरामधील नागरिकांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झालेले आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे तर त्यात दोन रुग्णांनी आपले प्राण गमवले आहेत. अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली असताना,शहरातले अनेक विभाग अति संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. अशी परिस्थिती शहरात उद्भवलेली असतानाही काशिमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या विभागातील काही नागरिक सकाळी पहाटेच्या दरम्यान मॉर्निंग वॉकच्या नावाखाली फिरताना पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली गेली आहे. काशीमीरा पोलिसांनी फिरणाऱ्या नागरिकांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ बी ,
कोव्हीड १९ उपाययोजना नियम२०२०, व भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम १८८,२६९,२७०,२७१ नुसार ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती मिळते आहे. शहरात गंभीर परिस्थिती उद्भवलेली असतानाही अनावश्यकपणे, मोकटपणे फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असताना पोलिसांनी याला लगाम लावण्यासाठी ही कारवाई केल्याचे समजत आहे.