मीरा-भाईंदर शहरात रुग्णांची संख्या पोहचली ६ वर 

 


 


मीरा-भाईंदर शहरात रुग्णांची संख्या पोहचली ६ वर 


महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसंदिवस वाढतच आहे. या सवंसर्गजन्य साथीने जगाला हवालदिल केले आहे. या साथीचा रुग्ण मिरा-भाईंदर मिळून आला आणि शहरात चिंता वाढली होती. ती वाढतच चालली आहे या चिंतेत शहरात आणखी भर पडली आहे. शहरात आता कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढून ती ६ वर पोहचली आहे. 


 शहरातील नागरिकांनी सतर्क राहावे. कुटुंबाची काळजी घ्यावी.कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सध्यस्थीत मिरा-भाईंदरमध्ये ६ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली .
मिरा-भाईंदरमध्ये ४४१ नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आहे. तसंच ३९७ नागरिकांना घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. रोज या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे ४४ स्वॅब तपासण्यांमध्ये ६ रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.तर २५ निगेटिव्ह असून १३ जणांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही.दरम्यान पोलिसांनी रुग्ण वास्तव्य करीत असलेल्या इमारतीकडे जाणारे रस्ते प्रतिबंधित केले असून पुढील आदेश येईपर्यंत कोणालाही घराबाहेर न पडण्याबाबत सांगण्यात आले आहे.संचारबंदी सुरू असतानाही नागरिक काळजी घेताना दिसत नाहीत. विनाकारण गर्दी केली जाते याचा परिणाम शहरात जाणवत आहे. जीवनावश्यक वस्तूच्या नावाखाली फिरणारे जास्त आहेत. त्याच बरोबर शहरातील नागरिकांनी अनावश्यक घरा बाहेर पडणे हे धोक्याचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. घराच्या बाहेर पडू नये अशी विनंती शासनाच्या वतीने वारंवार सांगण्यात येत आहे. तर नागरिकांकडुन अश्या तक्रारी समोर येत आहेत की , दुकानातील सामान, भाजीपाला, दररोज लागणाऱ्या वस्तू हे चढ्या भावाने विकले जात आहे. तर बऱ्याच दुकानात माल मिळत नाही त्यामुळे हे भाव वाढले आहेत. तर वेगवेगळ्या विभागात एकाच वस्तूची वेगवेगळी किंमत पाहायला मिळत आहे असे अनेक नागरिक सांगत आहेत यावर सरकारने लक्ष द्यावे. अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.